विभाग
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा
सामान्य प्रशासन विभाग
वित्त विभाग
ग्राम पंचायत विभाग
महिला व बालकल्याण विभाग
महात्मा गांधी ग्रा. रोजगार हमी योजना विभाग
पाणी व स्वच्छता विभाग
ग्रामीण पाणी पुरवठा विभाग
बांधकाम विभाग
लघुसिंचन विभाग
आरोग्य विभाग
पशुसंवर्धन विभाग
शिक्षण विभाग (प्राथमिक)
शिक्षण विभाग (माध्यमिक)
कृषी विभाग
समाज कल्याण विभाग
जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर
आधुनिक भारताच्या निर्मितीमध्ये पंचायत राज हा एक अभिनव प्रयोग आहे.
बलवंतराय मेहता समितीने (१९५८) ग्रामीण विकासात ग्रामीण जनतेला सहभागी करून घेण्यासाठी
त्रिस्तरीय पंचायत
राज पध्दतीची शिफारस केलेली आहे. त्यास अनुसरून महाराष्ट्र शासनाने दि. ०१ मे १९६२ रोजी
महाराष्ट्र जिल्हा
परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ चा कायदा सहमत केला व जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद, गट
पातळीवर पंचायत
समिती व गाव पातळीवर ग्राम पंचायत अशा रीतीने त्रिस्तरीय पंचायत राज ची स्थापना केली. अशा
प्रकारे पंचायत
राज पद्धतीचा स्वीकार करणारे महाराष्ट्र राज्य हे देशातील नववे राज्य बनले.
जिल्हा परिषद (सामान्यतः जि. प. म्हणून ओळखले जाते.) हि भारतातील जिल्हा स्तरावरील स्थानिक
सरकारी संस्था
आहे. साधारणपणे जिल्हा परिषदेचे कार्यालय हे जिल्हा मुख्यालय येथे असते.
महाराष्ट्र व केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती व सेवा ग्रामीण भागातील सामान्य
लोकांपर्यंत
पोहोचवण्याचे काम जिल्हा परिषद करते.
जिल्हा परिषदेचे मुलभूत कार्य
जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगर - एक दृष्टीक्षेप
जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगर ची स्थापना सन १९६२ ला झाली आणि जिल्हा परिषदेचे प्रत्यक्ष कामकाज ०१ मे १९६२ पासून सुरु झाले.
जि.प. छत्रपती संभाजीनगर अंतर्गत विविध विषय समित्या
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेची संरचना खालीलप्रमाणे :
निवडून आलेले सभासद : 0
पंचायत समितीचे सभापती : 0
सर्व पंचायत समित्यांचे एकूण सदस्य : 0
अ. क्र. | तालुका | जि. प. सदस्य संख्या | पं. स. सदस्य संख्या | महसुली गावे | ग्रा. पं. ची संख्या | ग्रा. पं. सदस्य संख्या |
---|---|---|---|---|---|---|
१ | छत्रपती संभाजीनगर | १० | २० | १७३ | ११४ | ९९९ |
२ | सिल्लोड | ०८ | १६ | १२७ | १०३ | ९१९ |
३ | गंगापूर | ०९ | १८ | २१२ | ११० | ९६२ |
४ | पैठण | ०९ | १८ | १८४ | १०७ | ८४० |
५ | कन्नड | ०८ | १६ | २०९ | १३७ | ११२९ |
६ | वैजापूर | ०७ | १६ | ११५ | १३५ | ११०५ |
७ | फुलंब्री | ०४ | ०८ | २७ | ७० | ५४९ |
८ | खुलताबाद | ०४ | ०६ | ७४ | ३९ | ३७८ |
९ | सोयगाव | ०३ | ०६ | ७८ | ४६ | ३९७ |
एकूण | ६२ | १२४ | ११९९ | ८६१ | ७२७८ |