star मुख्य वृक्ष लावा बाळगा अभिमान, तरच वाढेल देशाची शान | Save water, it will save you later !

star मुख्य वृक्ष लावा बाळगा अभिमान, तरच वाढेल देशाची शान | Save water, it will save you later !

वित्त विभाग

प्रस्तावना

वित्त विभाग हा जिल्हा परिषदेमध्ये असणा-या एकूण १४ विभागांपैकी एक महत्वाचा विभाग आहे. मुख्य लेखा व वित्त अधिकारी हे या विभागाचे प्रमुख आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी यांची मान्यता आवश्यक असणा-या जिल्हा परिषदेकडील सर्व विभागांकडील योजनाविषयक /आर्थिक बाबींविषयक प्रस्ताव-प्रकरणे यांची छाननी करुन आर्थिक/लेखाविषयक अभिप्राय देवून सादर करणेचे काम या विभागामार्फत केले जाते.

विभागाची रचना
vibhagrachana

अर्थसंकल्प शाखा : जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प तयार करणे, शासनाकडुन मंजूर झालेल्या अनुदानाचे कोषागारातून आहरण व संवितरण करणे, RTGS द्वारे वित्त प्रेषण वाटप करणे, सदर निधीचे नियोजन व खर्चावर नियंत्रण ठेवणे.

संकलन शाखा : जिल्हा परिषदेस प्राप्त झालेल्या शासनाच्या विविध योजनांच्या अनुदानातुन विभाग/ तालुकानिहाय झालेला खर्च संकलित करुन मासिक लेखे व वार्षिक लेखे तयार करुन मा.सर्वसाधारण सभेच्या मान्यतेने शासन राजपत्रात प्रसिध्द करणे.

निवृत्ती वेतन शाखा : जि.प.अंतर्गत वर्ग -3 व 4 कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतन/ कुटुंब निवृत्तीवेतन प्रकरणे मंजूर करणे. निवृत्ती वेतनाचे आदेश (PPO) निर्गमित करणे ही कामे केली जातात. जिल्हा स्तरावर निवृत्ती वेतन कक्ष स्थापन करण्यात आला असून मुख्यालय स्तरावरुनच जिल्हयातील जि.प.निवृत्ती वेतनधारक /कुटुंब निवृत्ती वेतन धारकांचे निवृत्ती वेतन R.T.G.S द्वारे थेट बँक खात्यावर जमा करण्यात येत आहे. सदर शाखेचे संनियत्रण अधिकारी उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी हे आहेत.

पुर्व लेखा परिक्षण शाखा -1/2/3 : जिल्हा परिषदेच्या विविध विभागाकडील वित्तीय बाबीविषयक प्राप्त संचिकेवर अभिप्राय देवून मान्यतेस्तव सादर करणे, तसेच प्राप्त देयके पारित करुन रक्कम संबंधिताचे खात्यावर RTGS / ZPFMS /LRS द्वारे Online Payment संबंधित एजन्सीच्या बँक खात्यावर जमा करणे ही कामे केली जातात.

वेतन पडताळणी शाखा : जि.प.वर्ग -3 व वर्ग - 4 कर्मचाऱ्यांचे वेतन निश्चितीची पडताळणी करणेचे काम केले जाते. सदर शाखेचे नियंत्रण अधिकारी लेखाधिकारी -2 आहेत.

गट विमा योजना शाखा : जि.प. वर्ग -3 व वर्ग - 4 कर्मचाऱ्यांचे गट विमा योजनेची प्रकरणे मंजूर करणे, तसेच प्राप्त देयके तयार करुन कोषागार कार्यालयात सादर करणे ही कामे केली जातात. सदर शाखेचे नियंत्रण अधिकारी उपमु.ले.व वि.अ. आहेत.

बाहय लेखा परिक्षण शाखा : जिल्हा परिषद विभाग व पंचायत समिती स्तरावरील स्थानिक निधी लेखा /पंचायत राज समिती /महालेखाकार नागपूर यांचे अहवालातील प्रलंबित परिच्छेदांचा निपटारा करणेसाठी अनुपालन पडताळणी शिबीराचे आयोजन करणे, तसेच जिल्हा परिषदेच्या विभागाचे व पंचायत समितींचे अंतर्गत लेखा परिक्षण व भांडार पडताळणी करणे व अहवाल निर्गमित करणे ही कामे केली जातात.

आस्थापना शाखा : जि.प.अंतर्गत लेखा कर्मचाऱ्यांच्या नेमणुका, पदोन्नत्या, नियतकालीक/जिल्हा बदल्या, खातेनिहाय चौकशी प्रकरणे व इतर आस्थापना विषयक लाभ मंजूर करणे इत्यादी, तसेच मु.ले.व वि.अ./उपमु.ले.व वि.अ./लेखाधिकारी, स.ले.अ./ क.ले.अ./व.स.(ले)/ क.स.(ले) इत्यादी संवर्गाची आस्थापना विषयक कामे करण्यात येतात.

आस्थापना शाखा : जि.प.अंतर्गत लेखा कर्मचाऱ्यांच्या नेमणुका, पदोन्नत्या, नियतकालीक/जिल्हा बदल्या, खातेनिहाय चौकशी प्रकरणे व इतर आस्थापना विषयक लाभ मंजूर करणे इत्यादी, तसेच मु.ले.व वि.अ./उपमु.ले.व वि.अ./लेखाधिकारी, स.ले.अ./ क.ले.अ./व.स.(ले)/ क.स.(ले) इत्यादी संवर्गाची आस्थापना विषयक कामे करण्यात येतात.

भविष्य निर्वाह निधी शाखा : जिल्हा परिषद अंतर्गत वर्ग -3 व वर्ग - 4 कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधीची प्राप्त प्रकरणे जसे भ.नि.नि.अंतिम प्रस्ताव, परतावा/ना-परतावा व इतर अनुषंगिक प्रकरणे मंजूर करणे, कर्मचाऱ्यांचे स्लिप वाटप करणे तसेच भ.नि.नि.ची देयके कोषागार कार्यालयात सादर करुन रक्कम RTGS द्वारे संबंधिताच्या खात्यावर जमा करणे. भ.नि.नि.वार्षिक खातेउतारा तयार करुन संबंधितास कार्यालय प्रमुखामार्फत अदा करणे ही कामे केली जातात. सदर शाखेचे नियंत्रण अधिकारी उपमु.ले.व वि.अ. आहेत.

DCPS / NPS (राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना) : जि.प.अंतर्गत वर्ग -3 व वर्ग -4 शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे DCPS/NPS प्राप्त प्रकरणे जसे अंतिम प्रस्ताव, ना-परतावा, सानुग्रह अनुदान व इतर अनुषंगिक प्रकरणे मंजूर करणे. शिक्षकेत्तर कर्मचारी हे NPS मध्ये असल्याने त्यांच्या स्लिप NSDL कार्यालयामार्फत Online पध्दतीने वाटप करणे ही कामे केली जातात. सदर शाखेचे नियंत्रण अधिकारी उपमु.ले.व वि.अ. आहेत.

वित्त विभागाचे कार्य एकूण 14 शाखांमध्ये विभागलेले आहे. प्रत्येक शाखेत एक वरिष्ठ सहाय्यक (लेखा) व एक कनिष्ठ सहाय्यक (लेखा) यांचा समावेश केलेला असून त्यांचेवर कनिष्ठ लेखाधिकारी व सहायक लेखाधिकारी हे पर्यवेक्षकीय कामे करतात.

पदांचा तपशील

अ. क्र. तपशील मंजुर पदे भरलेली पदे रिक्त पदे
मुख्य लेखा व वित्त अधिकारी ०१ ०१ ००
उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी ०१ ०१ ००
लेखाधिकारी ०२ ०२ ००
सहाय्यक लेखाधिकारी ०१ ०० ०१
कनिष्ठ लेखाधिकारी ०२ ०२ ००
वरिष्ठ सहाय्यक लेखा ०२ ०१ ०१
कनिष्ठ सहाय्यक लेखा १४ १२ ०२
एकूण ११५ ९१ २४

योजना व उपक्रम

अ. क्र. तपशील कर्मचारी संख्या
परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना (DCPS) - शिक्षक ३३१९
परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना (DCPS) – शिक्षकेतर १३००
एकूण ४६९१

शेरा: शिक्षक कर्मचाऱ्यांचे DCPS सन 2020-21 च्या स्लीप वाटप करण्याबाबत कार्यवाही सुरु आहे. तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी NPS मध्ये असुन त्यांच्या स्लिप NSDL कार्यालयामार्फत Online पध्दतीने वाटप करण्यात येतात.


सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम

जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगर सन २०२१-२२ मधील योजनांच्या जमाखर्चाचा ताळेबंद

सेवा जेष्ठता


वित्त विभाग - वित्त विभाग नियंत्रित कनिष्ठ लेखाधिकारी जिल्हा सेवा (वर्ग-3) लेखा तृतीय श्रेणी या संवर्गाची दिनांक 01.01.2024 रोजीची तात्पुरती ज्येष्ठता सुची प्रसिध्द करणेबाबत.

वित्त विभाग - वित्त विभाग नियंत्रित कनिष्ठ सहायक (लेखा) जिल्हा सेवा (वर्ग-3) लेखा तृतीय श्रेणी या संवर्गाची दिनांक 01.01.2024 रोजीची तात्पुरती ज्येष्ठता सुची प्रसिध्द करणेबाबत.

वित्त विभाग - वित्त विभाग नियंत्रित वरिष्ठ सहायक (लेखा) जिल्हा सेवा (वर्ग-3) लेखा तृतीय श्रेणी या संवर्गाची दिनांक 01.01.2024 रोजीची तात्पुरती ज्येष्ठता सुची प्रसिध्द करणेबाबत.

वित्त विभाग - वित्त विभाग नियंत्रित सहायक लेखाधिकारी जिल्हा सेवा (वर्ग-3) लेखा तृतीय श्रेणी या संवर्गातची दिनांक 01.01.2024 रोजीची तात्पुरती ज्येष्ठता सुची प्रसिध्द करणेबाबत.

माहितीचा अधिकार

नागरिकांची सनद


इतर महत्वाचे

bullet

माहिती लवकरच प्रकाशित होईल.

विभागप्रमुख

vibhagpramukh
श्री. चंद्रकांत पाटील

मुख्य लेखा व वित्त अधिकारी

वित्त विभाग

phone

0240-2352608

mail

cafozpaurangabad@gmail.com