शिक्षण विभाग (प्रा)
प्रस्तावना
शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगर मार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनांचे मुख्य उद्दिष्ट शिक्षणाचा दर्जा उंचावणे, विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे, विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती वाढविणे व ती टिकविणे हे असून योजनांचा फायदा प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पाहोचून शैक्षणिक विकास साधण्याचा विभागाचा सदैव प्रयत्न असतो.
शिक्षण विभागाकडे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक, अल्पसंख्यांक शाळातील शिक्षकांचे प्रशासनाची जबाबदारी असते. ग्रामीण भागामधील लोकांना मुलभूत शिक्षणाची सोय उपलब्ध करून देणे हे शासनाचे धोरण असुन त्याकरिता शिक्षण विभाग कटीबध्द आहे. ६ ते १४ या वयोगटातील सर्व मुले शाळेत दाखल करून घेण्यासाठी, सर्व शिक्षकांनी अथक प्रयत्न करावेत हे अभिप्रेत असुन गाव पातळीवरील ग्राम शिक्षण समितीच्या सहकार्याने हे मोलाचे काम केले जाते. या विभागामार्फत विद्यार्थ्यांच्या कल्याणाकरिता सर्वांगीण विकासाकरिता विविध योजना राबविल्या जातात. त्यामध्ये क्रिडा स्पर्धा, गणवेष व लेखन साहित्य वाटप, उपस्थिती भत्ता, शालेय पोषण आहार योजना, शिष्यवृत्ती, इ. योजनांचा समावेश आहे. जे विद्यार्थ्यी नियमितपणे शाळेत दाखल होण्यास असमर्थ आहेत, अशा विद्यार्थ्यांकरिता महात्मा फुले शिक्षण हमी योजना, वस्ती शाळा इ. वैशिष्टयपुर्ण व नाविन्यपुर्ण पर्यायी शिक्षणाची व्यवस्था या विभागा मार्फत करण्यात येते.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शाळांविषयी इतर माहिती
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शाळा - सांख्यिकी माहिती
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शाळेतील शिक्षक - सांख्यिकी माहिती
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शाळेतील विद्यार्थी - सांख्यिकी माहिती
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा
आय.एस.ओ. (ISO) प्रमाणित शाळा
प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत कामकाज व योजनाची माहीती :
प्रशासकीय कामकाज
जि. प. अंतर्गत सर्व प्राथमिक शाळांचे नियत्रंण व सुनियोजनाचे सर्व कामकाज.
शिक्षण समितीची सभा व त्यासंबंधीचे इतर कामकाज.
जि.प. प्राथमिक शाळेतील प्राथमिक शिक्षक मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी यांच्या नेमणुकी बदली पदोन्नती करणे.
जि. प. शाळा बांधकाम दुरुस्ती, क्रीडांगण व शालेय सोई.
जि.प. प्राथमिक शिक्षकांना वेतन देणे, वेतन निश्चीती करणे, चटोपाध्याय व वरिष्ट वेतन श्रेणी मंजुर करणे.
जि.प. शिक्षक पुरस्कार देणे, राज्य पुरस्कार व राष्ट्रीय पुरस्कारांचे प्रस्ताव शासनाकडे सादर करणे.
प्रा. शाळेत पुस्तकपेढी उघडणे, शैक्षणीकदृष्ट्या मागसलेल्या भागतील अनुसुचीत जाती जमातीच्या विद्याथ्र्यांना विशेष सवलती.
विना अनुदानीत खासगी बालवाड्यांना मान्यता देणे.
अनुदानीत, विनाअनुदानीत, कायम विनाअनुदानीत, नविन शाळा मान्यता, शिक्षक मान्यता, अ तुकड्यांना मान्यता, मान्यता प्राप्त खासगी हस्तांतरण, खासगी शाळांना वेतनोत्तर अनुदान.
खासगी, प्राथमिक शाळांची निवृत्तीची प्रकरणे.
शासकीय कामकाज
दुर्बल घटकातील प्राथमिक शाळेतील मुला मुलींना नियमीत शाळेत जाणे येणे करिता उपस्थिती भत्ता देणे.
शालेय पोषण आहार पुरविणे, ग्रामिण भागातील विद्याथ्र्यांना लेखन साहित्य व गणवेश पुरविणे.
आदर्श शाळा पुरस्कार
बाल भवन केंद्रांना अनुदान
शिष्यवृत्ती ४ थी व ७ वी साठी
समाजाच्या सहभागाच्या योजना
सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना
शैक्षणीक उठाव योजना
सर्व शिक्षा अभियान योजनेतंर्गत
शिक्षक अनुदान
गट साधन केंद्र अनुदान
समुह साधन केंद्र अनुदान
शिक्षक प्रशिक्षण अनुदान
शाळा बाह्य मुले शिक्षण
मोफत पाठ्यपुस्तक
अपंग मुलांच्या शिक्षणाची सोय
नागरी बांधकामे
शाळा-खोली बांधकाम
स्वछतागृह सुविधा
विद्युतीकरण
शाळा दुरुस्ती
संशोधन व मुल्यमापन
पर्यवेक्षण व संनियंत्रण
नाविन्यपुर्ण उपक्रम
लोक प्रतिनिधी प्रशिक्षण
विभागाचा संकल्प
६ ते १४ वयातील प्रत्येक मुल शाळेच्या मुख्य प्रवाहात आणणे.
१००% उपस्थिती व पटनोंदणीसाठी प्रयत्न करणे व गळतीचे प्रमाण ० वर आणणे.
जि. प. शाळांचा निकाल कमीत कमी ६०% वर लावणे, इयत्ता ४ थी व ७ वी शिष्यवृत्तीचा निकाल ८५% वर आणणे.
मुलींना उपस्थिती भत्ता वाटप करणे.
प्रत्येक मुल संगणक साक्षर होईल यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे.
तसेच जि. प. छत्रपती संभाजीनगर चे शिक्षण विभाग (प्रा.) द्वारे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा शैक्षणिक विकास होण्यासाठी व्हिजन - २०२० डोळ्यांसमोर ठेवून खालील योजना व उपक्रम संकल्पित करण्यात आलेले आहे.
वाडीवस्ती, तांड्यावरून मुलामुलींना शाळेत जाण्या-येण्यासाठी सायकली पुरविणे.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन तसेच त्यांच्यात वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी वाचनालय, स्पर्धा परीक्षा कक्ष, सौर उर्जा वर्ग स्थापन करणे.
प्राथमिक शाळांमध्ये विद्युतीकरण, पाणीपुरवठा, स्वच्छतागृह, इ. सुविधा पुरविणे.
शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी सुसज्ज प्रशिक्षण केंद्रांची स्थापना करणे.
विद्यार्थ्यांमध्ये खिलाडू वृत्ती विकसित करण्यासाठी सांघिक खेळांच्या स्पर्धांचे तालुका तसेच जिल्हा स्तरावर आयोजन करणे.
दैनंदिन अध्यापनात संगणकाचा वापर करणे.
ग्रामीण भागांत विद्यार्थ्यांची उपस्थिती टिकविण्यासाठी शाळेच्या वेळेत लवचिकता आणणे.
सौर अभ्यासिका वर्ग स्थापन करणे.
७०% लोक शेतीवर अवलंबून असल्याने शालेय अभ्यासक्रमात शेतीविषयक प्रात्यक्षिक बाबींचा समावेश करणे.
पदांचा तपशील
अ. क्र. | संवर्ग | मंजुर पदे | भरलेली पदे | रिक्त पदे |
---|---|---|---|---|
१ | विस्तार अधिकारी (शिक्षण) | ४५ | २७ | १८ |
२ | केंद्रप्रमुख | १२८ | ७२ | ५६ |
३ | मुख्याध्यापक | ५६४ | ५५५ | ०९ |
४ | पदवीधर प्राथमिक शिक्षक | २००४ | ५५५ | २८४ |
५ | सहशिक्षक | ६७६० | ६८३० | -७० |
६ | माध्यमिक शिक्षक | ४८३ | ४८३ | २३ |
७ | शारीरिक शिक्षक | ५५ | ४९ | ०६ |
८ | हस्तकला शिक्षक | ५५ | ०१ | २९ |
९ | चित्रकला शिक्षक | ५५ | ०१ | २४ |
१० | परिचर | १०१४९ | ९७७० | ४४९ (-७०) |
योजना व उपक्रम
सदर ज्ञानवर्गातून प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांनी मुलांच्या बौद्धिक, शारीरिक, मानसिक त्याचप्रमाणे मुलांना कसे समजावुन घ्यावे, त्यांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबर स्वभाव व आरोग्य यामध्ये समतोल कसा आणावा, तसेच मुलांच्या निर्माण होणाऱ्या अनेक समस्यांवर विनामुल्य मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
गणवेश पुरवठा योजना ही शासन निर्णय पीआरई-१०९८/८७८१/९८/प्राशि दि. १३ मार्च २००० अन्वये जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांतील अनुसुचित जाती व अनुसुचित जमाती, भटक्या विमुक्त जाती जमातीच्या दारिद्रय रेषेखालील विद्यार्थ्यांना विशेष सवलतीखाली गणवेश व लेखन साहित्य पुरविण्याची योजना १९७९-८० पासून कार्यान्वित केली आहे. त्याच अटी व शर्तीवर १९९९-२००० वर्षापासून चालु ठेवण्याकरीता शासनाने मंजुरी दिली आहे. या योजनेसाठी खालीलप्रमाणे निकष ठरवून दिले आहेत.
इ. १ ली ते ४ थी मधील सर्व पात्र मुले व मुली
या योजनेसाठी दरवर्षी उपलब्ध होणाऱ्या निधीतून सर्व विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करणे शक्य होत नाही. त्यामुळे लाभार्थी या योजनेपासून वंचित राहतात म्हणून या योजनेच्या सुरळीत अंमलबजावणीसाठी लाभार्थ्यांमध्ये निश्चित स्वरुपाचे प्राथम्यक्रम ठरविण्यात आलेले आहे. शासन निर्णय क्र. पीआरई-२०००/९७८/२०००/प्राशि-४ दि. १२ डिसेंबर २००१ नुसार खालील प्रमाणे गणवेश व लेखन साहित्यासाठी लाभार्थी विद्यार्थ्यांना गणवेशाचा लाभ देण्यासाठी प्राधान्यक्रम निश्चित केलेला आहे.
या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांस एकच गणवेश संच देण्यात यावा.
सन २००१-०२ या शैक्षणिक वर्षापासून वस्तीशाळा सुरु करण्यात आलेल्या असल्याने वस्तीशाळेतील सर्व विद्यार्थ्यांना गणवेश व लेखन साहित्याचा लाभ देण्यात यावा.
इ. १ ली ते ४ थी मधील दारिद्रय रेषेखालील अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती / विमुक्त भटक्या जाती / जमाती या संवर्गातील विद्यार्थ्यांना लाभ देण्यात यावा.
वरील गटातील विद्यार्थ्यांना गणवेश पुरवठा करुनही निधी शिल्लक राहिल्यास १०३ विकास गटातील सर्वसाधारण संवर्गातील दारिद्रय रेषेखालील इ. १ ली ते ४ थी मधील मुलींना याचा लाभ देण्यात यावा.
उपरोक्त तीनही गटातील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करुनही निधी शिल्लक राहिल्यास १०३ विकास गटातील सर्वसाधारण संवर्गातील दारिद्रय रेषेखालील इ. १ ली ते ४ थी मधील मुलांना याचा लाभ देण्यात यावा.
शासन निर्णय पीआरई-२००३/(१७/२००३)/प्राशि-४ दि. २० मे २००४ अन्वये सन २००४-०५ या शैक्षणिक वर्षापासून गणवेश वाटपाची योजना ही ग्रामशिक्षण समिती मार्फत राबविण्यासाठी आदेश आहेत. सदर गणवेश वाटपासाठी शासन निर्णय पीआरई-२००४(२०९)/०४/प्राशि-४ दि. ४ फेब्रुवारी २००५ नुसार गणवेशाचे कमाल दर कापड शिलाईसह खालील प्रमाणे दिलेले आहेत.
मुलांसाठी गणवेशाचा कमाल दर (शर्ट व पॅन्ट शिलाईसह) रु. ५७.२१ पैसे
मुलींसाठी गणवेशाचा कमाल दर (ब्लाउज व स्कर्ट शिलाईसह) रु. ६९.७५ पैसे याप्रमाणे गणवेशाचे दर निश्चित करुन दिल्याप्रमाणे दरवर्षी प्राप्त होणाऱ्या तरतुदीच्या अधीन राहून गणवेश व लेखन साहित्य पात्र लाभार्थी विद्यार्थ्यांना ग्रामशिक्षण समितीमार्फत वाटप करण्यात येते.
उद्देश: प्राथमिक शाळेत जाणा-या मुलींचे गळतीचे प्रमाण कमी करणे.
प्राथमिक शाळेत जाणा-या मुलींचे प्रमाण कमी असल्यामुळे गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी व उपस्थितीचे प्रमाण वाढविण्यासाठी, शिक्षणास प्रोत्साहन मिळावे या हेतूने इयत्ता १ ली ते ४ थी मधील शाळेत जाणा-या आदिवासी उप योजना क्षेत्रातील तसेच आदिवासी उपयोजना क्षेत्राव्यतिरिक्त राज्यातील अन्य भागातील अनुसुचीत जाती, भटक्या जाती व विमुक्त जमातीतील दारिद्रय रेषेखालील विद्यार्थीनींना नियमीत शाळेत उपस्थित राहण्यासाठी प्रोत्साहन म्हणून प्रतिदिनी, प्रत्येक मुली मागे रु. १/- या दराने ७५% उपस्थिती असलेल्या पात्र मुलींच्या पालकांना कमाल रु. २२०/- उपस्थिती भत्ता दिला जातो.सदर योजना सन १९९२ पासून शिक्षण व सेवायोजन विभाग शासन निर्णय - पीआरई १०९१/(९६१४) प्राशि १ मुबंई दि. १०/०१/१९९२ नुसार राबविण्यात येत आहे. सदर योजना बिगर आदिवासी, विशेष घटक व आदीवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना अशी राबविली जाते.
उद्देश:शाळांची अपूर्ण बांधकामे पूर्ण करणे व नवीन बांधकामे प्रस्तावित करणे.
प्राथमिक शाळेत जाणा-या मुलींचे प्रमाण कमी असल्यामुळे गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी व उपस्थितीचे प्रमाण वाढविण्यासाठी, शिक्षणास प्रोत्साहन मिळावे या हेतूने इयत्ता १ ली ते ४ थी मधील शाळेत जाणा-या आदिवासी उप योजना क्षेत्रातील तसेच आदिवासी उपयोजना क्षेत्राव्यतिरिक्त राज्यातील अन्य भागातील अनुसुचीत जाती, भटक्या जाती व विमुक्त जमातीतील दारिद्रय रेषेखालील विद्यार्थीनींना नियमीत शाळेत उपस्थित राहण्यासाठी प्रोत्साहन म्हणून प्रतिदिनी, प्रत्येक मुली मागे रु. १/- या दराने ७५% उपस्थिती असलेल्या पात्र मुलींच्या पालकांना कमाल रु. २२०/- उपस्थिती भत्ता दिला जातो.सदर योजना सन १९९२ पासून शिक्षण व सेवायोजन विभाग शासन निर्णय - पीआरई १०९१/(९६१४) प्राशि १ मुबंई दि. १०/०१/१९९२ नुसार राबविण्यात येत आहे. सदर योजना बिगर आदिवासी, विशेष घटक व आदीवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना अशी राबविली जाते.
उद्देश: आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींची शाळेतील उपस्थिती वाढविणे.
आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील मुली आर्थिक परिस्थितीमुळे शाळा सोडून जाऊ नयेत म्हणून त्यांच्या सहाय्यासाठी ही योजना आहे. समाजातील शिक्षणप्रेमी, दानशूर व्यक्तीकडून स्वयंस्फूर्त मिळणारा निधी बॅकेत ठेव म्हणून ठेवला जातो. त्या मुदत ठैवीतून आलेल्या व्याजातून इयत्ता ८ वी पर्यंतच्या विद्यार्थीनीस शिक्षणासाठी दरमहा रु. ३०/- याप्रमाणे १० महिन्याचे शैक्षणिक वर्षासाठी रु. ३००/- विद्यार्थीनीच्या पालकांना दिले जातात. ही मदत ग्राम शिक्षण समितीच्या मार्फत दिली जाते
शासन निर्णय क्र. पीआरई-१०९६/(४८/९६)/प्राशि-४ दि. १३/०९/१९९६ अन्वये सदर योजना लागू करण्यात आलेली आहे. स्त्रियांच्या साक्षरतेचे प्रमाण राष्टीय महिला साक्षरतेच्या ३९% पेक्षा कमी आहे. अशा १०३ विकास गटांना ही योजना लागू करण्यात आली आहे. या विकास गटातील इयत्ता १ ली ते ४ थी पर्यंत शिकत असणा-या सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठयपुस्तके पुरविली जातात. इयत्ता १ ली व २ री ला दरवर्षी व इयत्ता ३ री व ४ थी ला दोन वर्षांनी मोफत पाठयपुस्तके पुरविली जातात. १०३ विकास गटात शिकत असलेल्या १ ली ते ४ थी मधील सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थीनींची इयत्तावार संख्या शाळेचे मुख्याध्यापक गटशिक्षणाधिकारी यांना कळवितात. गटशिक्षणाधिकारी नियमाप्रमाणे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांना विद्यार्थी संख्या कळवितात. नंतर गटशिक्षणाधिकारी नियमाप्रमाणे सर्व शाळांना पाठयपुस्तके शाळेस पाठवितात. उपलब्ध निधीनुसार मोफत पाठयपुस्तकांचे वितरण शाळा सुरु झाल्यानंतर लगेचच केले जाते.
१०३ विकास गटातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील इ. १ ली ते ४ थी च्या सर्व विद्यार्थ्यांना शासन निर्णय पीआरई-१०९८/८७८१/(५१४/९८) प्राशि-४ दि. १३ मार्च २००० अन्वये विद्यार्थ्यांची गळती रोखून उपस्थिती वाढविण्याच्या दृष्टीने ही योजना शासनाने सन १९७९-८० पासून लागू केली आहे. या दोन्ही योजनेसाठी दरवर्षी उपलब्ध होणा-या निधीतून सर्व विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करणे शक्य होत नाही त्यामुळे लाभार्थी या योजनेपासून वंचित राहतात म्हणून या योजनेच्या सुरळीत अंमलबजावणीसाठी लाभार्थ्यांमध्ये निश्चित स्वरुपाचे प्राथम्यक्रम ठरविण्यात आलेले आहे. शासन निर्णय क्र. पीआरई-२०००/९७८/२०००/प्राशि-४ दि. १२ डिसेंबर २००१ नुसार खालील प्रमाणे गणवेश व लेखन साहित्यासाठी लाभार्थी विद्यार्थ्यांना गणवेशाचा लाभ देण्यासाठी प्राथम्यक्रम निश्चित केलेला आहे.
या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यास एकच गणवेश संच देण्यात यावा.
सन २००१-०२ या शैक्षणिक वर्षापासून वस्तीशाळा सुरु करण्यात आलेल्या असल्याने वस्तीशाळेतील सर्व विद्यार्थ्यांना गणवेश व लेखन साहित्याचा लाभ देण्यात यावा.
इ. १ ली ते ४ थी मधील दारिद्रय रेषेखालील अनुसूचित जाती /अनुसूचित जमाती/ विमुक्त भटक्या जाती/जमाती या संवर्गातील विद्यार्थ्यांना लाभ.
वरील १ व २ गटातील विद्यार्थ्यांना गणवेश पुरवठा करुनही निधी शिल्लक राहिल्यास १०३ विकास गटातील सर्वसाधारण संवर्गातील दारिद्रय रेषेखालील इ. १ ली ते ४ थी मधील मुलींना याचा लाभ देण्यात यावा.
उपरोक्त तीनही गटातील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करुनही निधी शिल्लक राहिल्यास १०३ विकास गटातील सर्वसाधारण संवर्गातील दारिद्रय रेषेखालील इ १ ली ते ४ थी मधील मुलांना याचा लाभ देण्यात यावा.
सदर गणवेश वाटपासाठी शा.नि.पीआरई-२००४/(२०९)/०४/प्राशि-४ दिनांक ०४ फेब्रुवारी २००५ नुसार गणवेशाचे कमाल दर कापड शिलाईसह खालीलप्रमाणे दिलेले आहेत.
मुलांसाठी गणवेशाचा कमाल दर (शर्ट व पॅन्ट शिलाईसह) रु. ५७.२१ पैसे
मुलींसाठी गणवेशाचा कमाल दर (ब्लाउज व स्कर्ट शिलाईसह) रु. ६९.७५ पैसे
सदर गणवेश वाटपासाठी शा.नि.पीआरई-याप्रमाणे गणवेशाचे दर निश्चित करुन दिल्याप्रमाणे दरवर्षी प्राप्त होणा-या तरतूदीच्या अधीन राहून गणवेश व लेखन साहित्य पात्र लाभार्थी विद्यार्थ्यांना ग्रामशिक्षण समितीमार्फत वाटप करण्यात येते.२००४/(२०९)/०४/प्राशि-४ दिनांक ०४ फेब्रुवारी २००५ नुसार गणवेशाचे कमाल दर कापड शिलाईसह खालीलप्रमाणे दिलेले आहेत.
उद्देश: प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचे प्रमाण वाढविणे.
प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करण्याच्या दृष्टीने तसेच प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या पटनोंदणी व उपस्थितीचे प्रमाण वाढविण्यासाठी आणि शाळेतील विद्यार्थ्यांची गळती थांबविण्याकरीता राज्यामध्ये २२ नोव्हेंबर १९९५ पासून इयत्ता १ ली ते ५ वीच्या विद्यार्थ्यांसाठी केंद्र शासन पुरस्कृत शालेय पोषण आहार योजना राबविण्यात येते. राज्यामध्ये ही योजना राज्य व केंद्र शासनाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, खाजगी अनुदानीत व अंशत: अनुदानीत शाळा, वस्तीशाळा, महात्मा फुले शिक्षण हमी योजना केंद्रे यांमधील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येते.
केंद्र शासनाने २००७-०८ या वर्षी या योजनेचा विस्तार करण्याचे दृष्टीकोनातून शैक्षणिकदृष्टया मागासलेल्या गटातील इयत्ता ६ वी ते ८ वी च्या विद्यार्थ्यांस तर २००८-०९ पासून राज्यातील इयत्ता ६ वी ते ८ वी च्या सर्व विद्यार्थ्यांना ही योजना लागू केली गेली. शालेय पोषण आहार योजना ही केंद्र शासनाने सन १९९५-९६ मध्ये सुरु केली त्यावेळी या योजनेचे स्वरुप हे विद्यार्थ्यांना प्रतिमाह ३ किलो मोफत तांदूळ देणे (Take Home Supplement) अशा स्वरुपाचे होते. त्यानंतर सन २००१ मध्ये मा. सर्वोच्च न्यायालयाने शालेय पोषण आहार योजनेमध्ये विद्यार्थ्यांना तांदूळ घरी न देता शिजवलेले अन्न (Cooked Food) द्यावे, अशा स्वरुपाचे आदेश दिले. त्यानुसार सन २००२ पासून या योजनेचे स्वरुप बदलून घरी तांदूळ देण्याऐवजी विद्यार्थ्यांना शाळेतच शिजविलेले अन्न देण्यात येत आहे.
अधिक वाचा...सदर योजनेअंतर्गत १०३ विकास गटातील १ ली ते ४ थी च्या विद्यार्थ्यांना मोफत पाठयपुस्तके व लेखन साहित्य या वर्षापासून पुरविले जाणार आहे.
प्राथमिक शाळेतील मुलींची पटनोंदणी वाढविण्यासाठी कार्य करणा-या प्राथमिक शिक्षकांना पुरस्कार देण्याची योजना सन २०१०-११ पासून राबविण्यात येत आहे.
पुर्व माध्यमिक व माध्यमिक शाळातील गुणवान विद्यार्थ्यांना प्रात्साहन देण्यासाठी खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती देण्याची ही योजना सन १९४५-५५ पासून कार्यन्वीत आहे. सध्या महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद पुणे यांचेमार्फत ही परिक्षा दरवर्षी घेण्यात येते. ही परिक्षा कनिष्ठ प्राथमिक स्तरावर शेवटच्या इयत्तेत म्हणजे इ. ४ थी मध्ये व प्राथमिक स्तरावर इ. ७ वी मध्ये घेण्यात येते. केंद्र शासनाने बालकांचा मोफत सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ पारित केला असून राज्यात कायद्याची अमंलबजावणी दि. ०१ एप्रिल २०१० पासून सुरु झालेली आहे. या कायद्यान्वये इ. १ ली ते ८ वी पर्यंतचे शिक्षण प्राथमिक शिक्षण म्हणुन विहित केलेले आहे. या कायाद्यातील तरतुदी विचारात घेऊन शालेय शिक्षण व क्रिडा विभाग शा.नि.दि. २०/०६/२०१५ राज्यात कार्यन्वित असलेली इ. ४ ऐवजी ५ वी आणि इ. ७ वी ऐवजी ८ वी मध्ये महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद, पुणे यांचे मार्फत घेण्यात येते. परिक्षेचे आयोजन महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद, पुणे मार्फत सन २०१६-१७ पासून इ. ५ वी व इ. ८ वी मध्ये नियमित घेण्यात येईल. यशस्वी विद्यार्थ्यांना पुरस्कार शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. शिष्यवृत्तीसाठी जिल्हा व तालुका पातळीवर निवड होते.
सेवा जेष्ठता यादी
शिक्षण विस्तार अधिकारी दिंनाक 1-1-24 तात्पुरती जेष्ठता सूची
केंद्रप्रमुख यांची दिनांक 1-1 2024 ची तात्पुरती ज्येष्ठता सूची
मुख्याध्यापक दिनांक 1-1- 24 ची तात्पुरती जेष्ठता सूची
माहितीचा अधिकार
नागरिकांची सनद
माहिती लवकरच प्रकाशित होईल.
इतर महत्वाचे
माहिती लवकरच प्रकाशित होईल.
विभागप्रमुख
श्रीमती जयश्री ए. चव्हाण
शिक्षणाधिकारी (प्राथमिक)
शिक्षण विभाग (प्राथमिक)
0240-2332025
ssampspabad@yahoo.com