शिक्षण विभाग (मा)
प्रस्तावना
शिक्षण विभाग (माध्यमिक), जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगर मार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनांचे मुख्य उद्दिष्ट माध्यमिक शिक्षणाचा दर्जा उंचावणे, विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे, विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती वाढविणे व ती टिकविणे हे असून योजनांचा फायदा प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पाहोचून शैक्षणिक विकास साधण्याचा विभागाचा सदैव प्रयत्न असतो.शिक्षण विभागाकडे (मा.) छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील माध्यमिक शाळातील शिक्षकांचे प्रशासनाची जबाबदारी असते.
या विभागामार्फत विद्यार्थ्यांच्या कल्याणाकरिता सर्वांगीण विकासाकरिता विविध योजना राबविल्या जातात. त्यामध्ये क्रिडा स्पर्धा, गणवेष व लेखन साहित्य वाटप, उपस्थिती भत्ता, शालेय पोषण आहार योजना, शिष्यवृत्ती, इ. योजनांचा समावेश आहे. जे विद्यार्थ्यी नियमितपणे शाळेत दाखल होण्यास असमर्थ आहेत, अशा विद्यार्थ्यांकरिता महात्मा फुले शिक्षण हमी योजना, वस्ती शाळा इ. वैशिष्टयपुर्ण व नाविन्यपुर्ण पर्यायी शिक्षणाची व्यवस्था या विभागा मार्फत करण्यात येते.
महत्त्वाचे कार्य:
- नवीन माध्यमिक शाळांना परवानगी देणे.
- विनाअनुदानित माध्यमिक शाळांचे मुल्यांकन करणे.
- विनानुदानित तुकड्यांना अनुदानावर आणणे.
- माध्यमिक शाळेतील शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मान्यता देणे.
- शाळेची पट पडताळणी करणे.
- वेतनेतर अनुदानाची तपसणी करणे.
- इ. १० वी व १२ वी च्या परीक्षेबाबत कामकाज.
- माध्यमिक शाळांची तपसणी करणे.
- खासगी शाळांची निवृत्तीची प्रकरणे.
योजना व उपक्रम
शिष्यवृत्ती ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रु. ३००००/- पेक्षा कमी आहे अशांना इ. ११ वी व १२ वी साठी १० महिन्यांकरिता देय असुन सदरहू शिष्यवृत्तीसाठी इयत्त्ता वी मध्ये किमान ६० टक्के गुण मिळणे आवश्यक आहे.
शिक्षणात मुलीना प्रोत्साहन देण्याकरिता शासनाने पहिजी ते १२ वी पर्यंत शिक्षण मोफत ठेवले आहे. शासनमान्य अनुदानीत माध्यमिक शाळेमध्ये ११ वी व १२ वी या वर्गात शिकत असलेल्या मुलींना मोफत शिक्षण मिळु शकते. त्यामुळे मुलींचे गळतीचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. या योजनेचे कार्यान्वीयीन अधिकारी शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद आहे.
महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय क्र. पी आय ७०७८/१, दिनांक १८/०६/१९६८ अन्वये प्राथमिक शाळेत शिकवित असलेल्या प्राथमिक शिक्षकांच्या पाल्यांना शुल्क माफी सवलत देण्याचा निर्णय जाहिर केला. या सवलती सर्व शैक्षणिक शाखामध्ये दिल्या जातात. या योजनेचे कार्यान्वीयीन आधिकारी शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद आहेत.
महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय क्र. एमडीएक/१०७२/२४८७/एस/, दिनांक १०/११/१९७२ अन्वये सैनिकांच्या मुलांना/मुलीना शैक्षणिक सवलती देण्याबाबतची सुधारीत योजना सुरु केलेली होती. सदर योजनेची व्याप्ती वाढवून मुलाना सैनिकांच्या मुलांना/मुलीना शैक्षणिक सवलती उपलब्ध आहे. या योजनेचे कार्यान्वीयीन अधिकारी शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद आहेत.
सर्व मान्यता प्राप्त शैक्षणिक संस्थामध्ये आर्थिकदृष्या मागासलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणित फीच्या दराएवढे शल्क फी माफीची प्रतिपुर्ती करण्याकरिता ही योजना राबविण्यात येत आहे. अनुदानित व विनाअनुदानित अशा दोन्ही प्रकारच्या संस्थांमधील विद्यार्थ्यांना योजनांचा फायदा मिळु शकतो. विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे किंवा नाही ते ठरविण्याकरिता शासनाने सन १९९२-९३ पासुन प्रति विद्यार्थ्यास पदवी अभ्यासक्रमा पर्यत रु. १५०००/- इतकी वार्षिक उत्पन्ननाची मर्यादा करण्याचा निणय घेण्यात आला आहे. या योजनेचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद आहेत.
सदरीत योजना राज्यातील अनुदानीत शासकीय माध्यमिक शाळेतील व उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचा-यांच्या पाल्यांना इयत्ता ११ वी व १२ वी ते पदवी पर्यत नि:शुल्क योजनांततर्गत सन १९९५-९६ पासुन फी ची प्रतीपुर्ती केली जाते.
सन १९९६-९७ पासुन शैक्षणिक वर्षापासुन राज्यातील प्रमाणित दराने शुल्क आकारणा-या मान्यताप्राप्त अशासकीय अनुदानित व विनाअनुदानित संस्थातील इयता १ ली ते १० वी पर्यंत शिक्षण घेणा-या सर्व मुलामुलींना नि:शुल्क शिक्षण देण्यात येत आहे. सदर योजना लागु केल्यामुळे इ. १ ली ते १० वी तील मुलींना मोफत शिक्षण व ६ ते १४ वयोगटातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती/प्राथमिक/माध्यमिक शिक्षकांच्या पाल्यांना मिळणाऱ्या शैक्षणिक सवलतीचा लाभ योजनेमध्ये समाविष्ट आहे.सदर योजनाकरीता निकष:
- महाराष्ट्रातील १५ वर्षे रहिवासी असलेल्या पालकांचे पाल्य
- ७५ टक्के उपस्थिती चांगली वागणूक
- प्रविष्ठ वर्गा आधीची परीक्षा उत्तीर्ण.
सदरील योजने अतंर्गात ११ वी ते १२ वी व पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी शिष्यवृती देण्यात येते. या योजनेचे कार्यान्वीयीन अधिकारी शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद हे आहेत.
कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना राज्य शासनाची खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती देण्यात येते. सदरील योजना माध्यमिक शालांत परीक्षेस ६० टक्के गुण मिळविणा-या विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार शिष्यवृत्ती वर्ष १९९८-९९ पासून फी ची प्रतीपुर्ती केली जाते. या योजनेचे कार्यान्वीयीन अधिकारी शिक्षणाधिकारी (माध्यामिक), जिल्हा परिषद हे आहेत.
इयत्त्ता ९ वी च्या विद्यार्थ्यांसाठी पुस्तक पेढी योजना अंतर्गत अनुसुचित जाती/जमाती, भटक्या/विमुक्त जमाती, आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील पात्र २५ टक्के विद्यार्थ्यांना नव्याने पाठयपुस्तक संच उपलब्ध करुन देण्यात येते. या योजनेचे कार्यान्वीयीन आधिकारी शिक्षणाधिकारी (माध्यामिक), जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगर हे आहेत.
माहितीचा अधिकार
माहिती लवकरच प्रकाशित होईल.
नागरिकांची सनद
माहिती लवकरच प्रकाशित होईल.
इतर महत्वाचे
माहिती लवकरच प्रकाशित होईल.
विभागप्रमुख
श्रीमती जयश्री चव्हाण
शिक्षणाधिकारी (माध्यमिक)
शिक्षण विभाग (माध्यमिक)
0240-2332025
payunitsecaurangabad@gmail.com