समाजकल्याण विभाग
प्रस्तावना
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत समाज कल्याण विभाग अनुसूचित जाती, नवबौध्द दिव्यांग व दुर्बल घटक यांच्या सर्वांगीण विकासाच्या हेतु पूर्ततेसाठी कार्यरत असून विभागामार्फत सामाजिक, आर्थिक, शारिरीक दृष्टया दुर्बल घटकांचे कल्याणाचे काम निरंतर चालु आहे.त्यानुषंगाने छत्रपती संभाजीनगर जिल्हयातील सामाजिक न्याय विभागाच्या योजना राबवितांना अनुसूचित जाती, नवबौध्द दिव्यांग व दुर्बल घटक यांची विशेष काळजीपूर्वक शैक्षणिक, आर्थिक हित संवर्धन व सामाजिक अन्यायापासून संरक्षण करण्याचे कामकाज या विभागामार्फत होत आहे समाजातील अनुसूचित जाती, नवबौध्द दिव्यांग व दुर्बल घटकांना शहरी व ग्रामीण भागातील शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक, वैयक्तिक व कुटुंबाच्या लाभाच्या नवनविन योजनांचा लाभ देऊन त्यांचे राहणीमान उंचावून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरीता विविध योजना राबवणे हे समाज कल्याण विभागाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
माहितीचा अधिकार
अ. क्र. | तपशील | तपशील | भरलेली पदे | रिक्त पदे |
---|---|---|---|---|
१. | जिल्हा समाज कल्याण अधिकारी | ०१ | अतिरिक्त कार्यभार | ०१ |
२. | कार्यालयीन अधिक्षक | ०१ | ०१ | ०० |
३. | कनिष्ठ प्रशासन अधिकारी | ०१ | ०० | ०१ |
४. | सहाय्यक लेखा अधिकारी | ०१ | ०१ | ०० |
५. | वैद्यकीय सामा. कार्यकर्ता | ०१ | ०० | ०१ |
६. | समाज कल्याण निरीक्षक | ०५ | ०४ | ०१ |
७. | सहाय्यक सल्लागार | ०५ | ०० | ०१ |
८. | वरीष्ठ लिपीक | ०२ | ०० | ०२ |
९. | कनिष्ठ सहाय्यक लेखा | ०१ | ०० | ०१ |
१०. | कनिष्ठ लिपीक | ०१ | ०० | ०१ |
११. | वाहन चालक | ०१ | ०० | ०१ |
१२. | परिचर | ०३ | ०२ | ०१ |
एकूण | १९ | ८ | ११ |
योजना व उपक्रम
अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती व भटक्या व विशेष मागास प्रवर्गामधील मुले/मुली शिक्षणापासुन वंचीत राहु नयेत, म्हणुन सर्व मान्यताप्राप्त शिक्षणक्रमासाठी शालेय फि माफ व परिक्षा फॉर्म फी अदा करणे. तसेच एक-वेळ एकावर्गात नापास असलेल्या विद्यार्थ्यांला शालेय फि मंजुर करणे.
अटी व शर्तीयोजनेची माहिती: मान्यता प्राप्त माध्यमिक शाळेत शिक्षण घेत असलेले अनुसुचीत जाती - जमाती विमुक्त व भटक्या जमातीतील विद्यार्थ्यांंना शिक्षणात जास्त प्रोत्साहन मिळणेसाठी शिष्यवृत्ती योजना राबविली जाते.अर्जासोबत विद्यालयाने संबधीत विद्यार्थ्यांंची यादी, जात, इयत्ता व त्यांच्या गुणपत्रकाची झेरॉक्स प्रत पाठविणे आवश्यक आहे.या योजनेतंर्गत इ. ५ वी ते ७ वी मधील प्रत्येक वर्गातील २ विद्यार्थ्यांंना दरमहा रु ५०/- प्रमाणे १० महिन्याचे रु ५००/- तसेच इ. ८ वी ते १० मधील प्रत्येक वर्गातील २ विद्यार्थ्यांंना दरमहा रु १००/- प्रमाणे दहा महीन्याचे रु १०००/- या दराने शिष्यवृत्ती दिली जाते.
उद्देशमाध्यमिक शाळेतील अनुसुचीत जाती, जमाती विमुक्त व भटक्या जमातीतील विद्यार्थ्यांंना शिक्षणात जास्त प्रोत्साहन देणे.
अटी व शर्तीयोजनेची माहिती: प्राथमिक शाळेमध्ये अनुसुचित जाती - जमाती, विमुक्त व भटक्या जमाती व विशेष मागासवर्गीय मुलींचे गळतीचे प्रमाण कमी व्हावे म्हणुन सदरचा उपस्थिती भत्ता अदा करण्यात येतो.संबधीत शाळेकडुन मागासवर्गीय मुलींच्या नावांच्या यादीचा प्रस्ताव पाठविणे आवश्यक.या शिष्यवृत्ती मध्ये मागासवर्गीय मुलींना दरमहा ६० रु प्रमाणे १० महिन्याकरीता रु ६००/- अदा केले जातात.
उद्देशमान्यता प्राप्त माध्यमिक शाळेत शिक्षण घेत असलेले अनुसुचित जाती, जमाती विमुक्त व भटक्या जमातीतील विद्यार्थ्यांंना शिक्षणात जास्त प्रोत्साहन देणे.
अटी व शर्तीयोजनेची माहिती: शाळेमध्ये अनुसूचित जाती-जमाती, विमुक्त-भटक्या जमाती व विशेष मागासवर्गीय मुलींचे गळतीचे प्रमाण कमी व्हावे, म्हणुन सदरचा उपस्थिती भत्ता अदा करण्ंयात येतो.संबधीत शाळेकडुन मागासवर्गीय मुलींच्या नावाच्या यादीचा प्रस्ताव आवश्यक.सर्व मागासवर्गीय मुलींना दर महा रु १००/- प्रमाणे दहा महिन्याकरीता १०००/- अदा केले जातात.
उद्देशशाळेमध्ये अनुसूचित जाती-जमाती, विमुक्त-भटक्या जमाती व विशेष मागासवर्गीय मुलीचे गळतीचे प्रमाण कमी करणे.
अटी व शर्तीयोजनेची माहिती: सामाजिक विषमता दूर होवुन समाजामध्ये समतेची भावना रुजावी व समाज एकसंध व्हावा, जातीपातीचे समुळ निर्मुलन व्हावे यासाठी ही योजना राबविली जाते.या योजनेतंर्गत लाभार्थ्यांस रक्कम रु ५००००/- धनादेशाद्वारे प्रोत्साहानपर अनूदान देण्यात येऊन त्यांचा सत्कार करण्यात येतो.
उद्देशसामाजिक विषमता दूर करणे, समाजामध्ये समतेची भावना रुजवणे व समाज एकसंध करणेसाठी जातीपातीचे समुळ निर्मुलन करणे.
अटी व शर्तीयोजनेची माहिती: अनुसूचित जातीच्या वस्त्यांमध्ये स्वच्छता, पाणी पुरवठा, दिव्याची सोय, समाज मंदिर, जोडरस्ते, शौचालय, पिण्याच्या पाण्याची विहीर, इत्यादी सुविधा उपलब्ध करणेसाठी हि योजना राबविली जाते.प्रत्येक अनुसूचित जातीच्या वस्तीसाठी रु. १०.०० लक्षापर्यंत निधी दिला जातो.
उद्देशया करीता नगरपालिका भागात मुख्यधिकारी यांनी प्रमाणित केलेले व्यवसाय प्रमाणपत्र अथवा ग्राम विकास अधिकारी/ ग्रामसेवक यांनी प्रमाणित केलेले व्यवसाय प्रमाणपत्र आवयक.
अटी व शर्तीवस्तीची लोकसंख्या १५० च्या पुढे असणे आवश्यक.
योजनेची माहिती: अस्वच्छ व्यवसायात जनावराची कातडी कमावणे, कातडी सोलणे, रुखी काम करणे यापैकी व्यवसाय करीत असलेल्या पालकांच्या कोणत्याही जाती जमातीच्या विद्यार्थ्यांंना इ. १ ते १० पर्यत शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देणेसाठी हि योजना राबविली जाते.
उद्देश:अस्वच्छ व्यवसाय करीत असलेल्या पालकांच्या कोणत्याही जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांंना इ. १ ते १० पर्यत शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देणे.
अटी व शर्तीयोजनेची माहिती: ग्रामिण व शहरी भागातील गोरगरीब झोपडपटीमध्ये जीवन जगणाऱ्या लोकांचे अतिशय कष्टकरी व्यक्तीना व्यसनापासुन परावृत्त करुन त्याचे जीवनमान सुधारणेसाठी प्रयत्न केले जाते.सदर योजनेतंर्गत व्यसनमुक्ती करणेसाठी समाज कल्याण विभागामार्फत व्यसनमुक्तीवर आधारीत किर्तन व प्रवचन, व्याख्यान व कलापथक, भारुड, पथनाटय इ. कार्यक्रम राबविले जातात.
योजनेची माहिती: शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस शिक्षण घेणाऱ्या अनुसुचित जातीच्या विद्यार्थ्यांंना आर्थीक सहाय्य करणेसाठी हि योजना राबविली जाते. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांंना जिल्हा परिषद कार्यालयाकडुन दरमहा रु. २०/- व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडुन दरमहा रु ६०/- विद्यावेतन दिले जाते.
उद्देशशासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस शिक्षण घेणाऱ्या अनुसुचित जातीच्या विद्यार्थ्यांंना आर्थीक सहाय्य करणे व शैक्षणिक खर्चाचा भार उचलणे.
अटी व शर्तीयोजनेची माहिती: अपंगांनी स्वत:च्या पायावर उभे राहुन स्वावलंबी व्हावे व त्यांना समाजाचा कृतिशिल घटक म्हणुन सन्मानाने जगता यावे यासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता करण्यासाठी योग्य अपंगांना राज्य सरकारची शिष्यवृत्ती.
उद्देशअपंग विद्यार्थ्यांनी स्वत:च्या पायावर उभे राहुन स्वावलंबी व्हावे व त्यांना समाजाचा कृतिशिल घटक म्हणुन सन्मानाने जगता यावे यासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता प्राप्त करणेसाठी अपंगांना आर्थिक मदत करणे.
अटी व शर्तीयोजनेची माहिती: अपंग व्यक्तीना स्वत:चा व्यवसाय करता यावा म्हणुन सदर योजना राबविली जाते, या मध्ये बॅंकेने मंजुर केलेल्या कर्जाच्या कमाल २० टक्के इतक्या मर्यादेपर्यंत बीजभांडवल अनुदान दिले जाते.
उद्देशअपंग व्यक्तीना स्वत:चा व्यवसाय करता येणे.
अटी व शर्तीयोजनेची माहिती: अपंगांना त्यांचे अपंगत्व सुधारण्यासाठी अपंगत्वाची वाढ रोखण्यासाठी व त्यांच्य हालचाली सुलभ होण्यासाठी अपंगत्वानुसार निरनिराळी कृतिम साधणे आवश्यक असतात. तथापि या साधनांची किंमत सामान्य पालकांना/व्यक्तीना त्यांच्या मर्यादित उत्पन्नातुन घेता येत नाही. अशा आर्थिक दृष्टया मागासलेल्या गरजू अपंगांना कृत्रिम साधणे, उपकरणे उपलब्ध करून देण्यात येते. या योजनेनुसार अपंगांना कृत्रिम अवयव, तीन चाकी सायकल, श्रवणयंत्र, इत्यादी साधणे पुरविण्यात येतात.
उद्देशआर्थिक दृष्टया मागासलेल्या गरजु अपंगांना कृत्रिम साधणे, उपकरणे उपलब्ध करून देणे.
अटी व शर्तीयोजनेची माहिती: योजनेच्या माध्यमातुन मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे शिक्षण पुर्ण करण्याच्या दृष्टीकोणातुन अनुदानीत वसतिगृहाची योजना कार्यन्वित आहे. ग्रामिण भागामध्ये मागास विद्यार्थ्यांमध्ये शाळा गळतीचे प्रमाणास अटकाव बसावा, आर्थिक दुरावस्थेमुळे मागासवर्गीय पालकांना त्यांच्या मुलांच्या शिक्षणात अडचणी येवु नयेत म्हणुन ही योजना कार्यन्वित आहे.
उद्देशविद्यार्थी एकाच इयत्तेत दोनदा नापास झालेला नसावा.
अटी व शर्ती-
अटी व शर्ती-
मागासर्गीयाच्या वस्तीत सुधारणा करणे.
अटी व शर्तीमागासवर्गीय वस्तीतील लोकसंख्या कमीत कमी 150 असणे आवश्यक आहे.
माहितीचा अधिकार
माहिती लवकरच प्रकाशित होईल.
विविध योजनांच्या लाभार्थ्यांची निवड यादी
माहिती लवकरच प्रकाशित होईल.
माहितीचा अधिकार
माहिती लवकरच प्रकाशित होईल.
नागरिकांची सनद
माहिती लवकरच प्रकाशित होईल.
इतर महत्वाचे
माहिती लवकरच प्रकाशित होईल.
विभागप्रमुख
श्री.ओमप्रकाश रामावत
समाज कल्याण अधिकारी (प्र.)
समाज कल्याण विभाग
0240-2353952
dswozpaurangabad1@gmail.com