महात्मा गांधी ग्रा. रोजगार हमी योजना
प्रस्तावना
उद्देश:
ग्रामीण भागातील जनतेसाठी रोजगार उपलब्ध करून त्यांचे दारिद्र्य काही प्रमाणात कमी करणे.
शासन निर्णय: राज्याच्या आर्थिक विकासासाठी महाराष्ट्र शासनाच्या १५ कलमी कार्यक्रमाचा भाग म्हणून २८ मार्च १९७२ रोजी, General Administration Department, No. FD/EGS/१०७२/P-१, या निर्णयानुसार रोजगार हमी योजना मंजूर करण्यात आली. वेळेनुसार या योजनेची पुनरर्चना करण्यात आली आहे. सध्या हि योजना महाराष्ट्र रोजगार हमी योजना या नावाने कार्यरत आहे. या योजनेचे उद्दिष्ट पूर्ण होणेसाठी तसेच या योजनेची परिणामकारक अंमलबजावणीसाठी वेळोवेळी विविध शासन निर्णयांमध्ये तसेच शासकीय परीपत्रकांमध्ये या योजनेचा उल्लेख करण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्याच्या या योजनेचे उल्लेखनीय परिणाम पाहून ०७ सप्टेंबर २००५ रोजी भारत सरकारने राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (NAREGA), २००५ अस्तित्वात आणला. ग्रामीण भागातील प्रौढ जनतेची रोजगाराची मागणी पूर्ण करणे तसेच अकुशल काम करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी एका आर्थिक वर्षात १०० दिवस नौकरी उपलब्ध करून देणेची हमी नरेगा कायदा देतो. नरेगा योजना हि केंद्र सरकारने सुचविलेल्या भागांसाठी लागु असून पाच वर्षांत संपूर्ण भारत या योजनेखाली आणले जाईल.
ग्रामपंचायतीच्या जबाबदा-या :
कुटुंबाची नोंदणी.
रोजगार उपलब्ध करणे.
ग्रामसभेच्या माध्यमातून रोजगाराच्या गरजेचा पूर्व वार्षिक अंदाज घेणे, त्याचप्रमाणे नियोजन आराखडा व कामाचे प्राधान्य ठरविणे.
सामाजिक अंकेषण (Social Audit) व पारदर्शकता.
दक्षता समिती.
रोजगार दिवस.
पंचायत समितीच्या जबाबदा-या :
समिती क्षेत्रातील सर्व ग्रामपंचायतीचे समन्वयन, सनियंत्रण व कामाचे नियोजन.
पंचायत समितीच्या जबाबदा-या :
समिती क्षेत्रातील सर्व ग्रामपंचायतीचे समन्वयन, सनियंत्रण व कामाचे नियोजन.
सनियंत्रण, समन्वयन.
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना विभागाची माहिती
पदांचा तपशील
माहिती लवकरच प्रकाशित होईल.
योजना व उपक्रम
सद्य:स्थितीत राज्यात महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियिम, १९७७ अंमलात आहे व या कायद्यांतर्गत खालील योजना सुरु आहेत.
महाराष्ट्र (MGNREGS) या योजनेंतर्गत केंद्र शासन १०० दिवस प्रति कुटुंब रोजगाराची हमी देते व १०० दिवस प्रति कुटुंब मजुरीच्या खर्चासाठी निधी पुरवते. प्रति कुटुंब १०० दिवसावरील प्रत्येक मजुराच्या, मजुरीच्या खर्चाचा आर्थिक भार राज्य शासन उचलते.
महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियम, १९७७ सुधारीत कलम (१२) (ई) नुसार वैयक्तिक लाभाच्या योजना अनुदान तत्वावर प्रतिपूर्ती योजना म्हणून राबविण्यात येतात.
जवाहर / धडक सिंचन विहिर योजना रोहयोंतर्गत फळबाग लागवड योजना.
रोहयोंतर्गत फळबाग लागवड योजना.
याशिवाय राज्य शासनाचा निधी पुढील बाबींकरिता वापरला जातो
राज्य रोजगार हमी योजनेतील प्रगतीपथावरील अपूर्ण (कुशल) कामे पुर्ण करण्याकरिता.
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना विभागाची माहिती
माहितीचा अधिकार
माहिती लवकरच प्रकाशित होईल.
नागरिकांची सनद
माहिती लवकरच प्रकाशित होईल.
इतर महत्वाचे
माहिती लवकरच प्रकाशित होईल.
विभागप्रमुख
श्रीमती.अनुपमा नंदनवनकर
उप मुख्य कार्यकारी अधिकारी (म.गां.रा.ग्रा.रो.ह.यो.)(प्र)
महात्मा गांधी ग्रा. रोजगार हमी योजना
0240-2340740
mgnregacellzpaurangabad@gmail.com