पशुसंवर्धन विभाग
प्रस्तावना
पशुसवंर्धन विभाग, ग्रामीण भागातील जनावरांच्या रोगांची लक्षणे, व त्यावरील प्रतिबंधात्मक लसीकरणाद्वारे उपाय योजना करणे, तसेच दुधाळ जनावरांचे पालन, दुग्धव्यवसायाकरिता प्रशिक्षण देणे व पशुसवंर्धन विभागाच्या विविध योजनांची माहिती व आधुनिक तंत्रज्ञान इ. विषयाची माहिती व प्रात्यक्षीक दाखवुन शेतक-यांना जनावरांची जोपासना चांगली करण्यांबाबत माहिती देणे हे या विभागामार्फत केल्या जाते. शासनाच्या पशुसवंर्धना संबंधीत विविध योजनांची अंमलबजावणी हा विभाग करीत असते. यामध्ये प्रामुख्याने, दुधाळ जनावरांचा गट वाटप, शेळी/मेंढी वाटप अंतर्गत अनुसूचित जाती-जमाती, सर्वसाधरण, दारीद्रयरेषेखालील, भुमिहीन जनतेला शासनाच्या योजनांचा लाभ या विभागामार्फत दिल्या जातो.
जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जि. प. छत्रपती संभाजीनगर हे विभागाचे प्रमुख असून, निरनिराळ्या योजनेचे अंमलबजावणी अधिकारी असतात. तसेच ते केंद्रस्तर व राज्यस्तर व जिल्हा परिषद उपकारमधून राबविण्यात येणाऱ्या योजनांची अंमलबजावणी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी व मा. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करतात.
महत्त्वाचे कार्य:
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदे अंतर्गत एकूण ८२ पशूवैद्यकीय दवाखाने श्रे-१ व श्रे-२ कार्यरत असून, श्रे-१ चे ३८ पशुवैद्यकीय दवाखाने
श्रे-२ ची ४६ दवाखाने कार्यरत आहेत.
पशूवैद्यकीय दवाखाने श्रे-१ व श्रे-२ यांच्या द्वारे विविध प्रकारची कृत्रिम रेतन, औषधोपचार, लसीकरण, खच्चीकरण, गर्भातपासणी वंध्यत्व तपासणी, संकरीत वासरांची पैदास, नमुने तपासणी, शस्त्रक्रिया इत्यादी स्वरूपाचे तांत्रिक कामकाज व शासकीय योजना राबविण्याचे कामकाज केले जाते.
गट पातळीवर पशुधन विकास अधिकारी (वि) हे समन्वयक अधिकारी म्हणून शासनस्तर व जिल्हा परिषद स्तरावरील निरनिराळ्या योजना राबविण्याचे दृष्टीने पंचायत समिती त्या अंतर्गत असणारे दवाखान्याद्वारे गट विकास अधिकारी यांच्या वतीने योजना राबवतात.
तालुकानिहाय एकूण पशुधन
निवडक पशुवैद्यकीय दवाखान्यांचे छायाचित्रे
अधिक माहितीसाठी येथे क्लीक करा.
पदांचा तपशील
माहिती लवकरच प्रकाशित होईल.
योजना व उपक्रम
पशुधन खात्यामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या राज्य व केंद्र पुरस्कृत योजना
पशुवैद्यकीय दवाखान्याची स्थापना
जिल्ह्यांतर्गत एकून पशुधन संख्येनुसार पशूवैद्यकीय दवाखान्यांचा ज्या ठीकांनी अनुशेष शिल्लक आहे. त्या ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखाने श्रे. १ स्थापन करण्याची खात्यामार्फत मार्गदर्शक सूचनेनुसार कार्यवाही करण्यात येते.
पशुवैद्यकीय दवाखान्यांची दर्जावाढ
जिल्ह्यांतर्गत पशूवैद्यकीय दवाखाने श्रे. २ ची दर्जावाढ करण्यात येवून श्रे. १ मध्ये स्थापन करण्याची खात्याच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कार्यवाही करण्यात येते.
पशुवैद्यकीय दवाखाने बांधकाम
जिल्ह्यांतर्गत असलेल्या पशुवैद्यकीय दवाखाने श्रे. १ ई श्रे. २ करिता पशुवैद्यकीय दवाखाना इमारत तसेच अधिकारी / कर्मचारी यांचे निवासस्थाने बांधण्याबाबत योजना हाती घेण्यात येते. ग्रामीण स्तरावरून सदरिल इमारातींकरीता ग्रामपंचायत हद्दीतील जागा जिल्हा परिषदेस दान करणे आवश्यक आहे.
प्रदर्शन व प्रचार
ग्रामीण भागातील पशुपालकांना / शेतकऱ्यांना पशुसंवर्धना विषयी सर्वांगीण माहिती मिळावी व त्यायोगे त्यांना पशुसंवर्धनाबाबत आवड निर्माण होवून शाश्वत उत्पन्नाचे साधन म्हणून पशुपालाकडे बघण्याची दृष्टी उपलब्ध करून देने हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
वैरण विकास योजना
पशुपालकांकडील दुधाळ जनावरांना हिरवा चारा उपलब्धतेकरिता तसेच शेतकऱ्यांना विविध वैरण विषयक पिकांची माहिती होण्याच्या दृष्टीने त्यांचेकडील स्वतःच्या जमिनीवर वैरण विकासास प्रोत्साहन देण्याकरिता १००% अनुदानावर विविध प्रकारच्या वैरण बियाण्याचे वाटप करण्यात येते.
विशेष पशुधन उत्पादन कार्यक्रम
या कार्यक्रमांतर्गत संकरित कालवडी व सुधारित म्हशींच्या पारड्यांच्या जोपासनेकारिता ३२ ते ४० महिन्यांपर्यंत पशुखाद्याचा पुरवठा करण्यात येतो. यामध्ये अल्प व अत्यल्प भूधारक यांना ५० टक्के अनुदानावर व भूमिहीन शेतमजूर यांना ५० टक्के अनुदानावर खाद्याचा पुरवठा करण्यात येतो. तसेच सदरील लाभधारकांना कालवडीच्या संगोपनांबाबत ३ दिवस प्रशिक्षण देण्यात येते. व संकरीत कालवडी व पारड्यांचा विमा काढण्यात येतो.
एकात्मिक कुक्कुट विकास कार्यक्रम
या कार्यक्रमांतर्गत तलंगा गट वाटप योजना व एक दिवशीय सुधारित पिलांचे गटांचे वाटप ५० टक्के अनुदानावर सदर योजनेअंतर्गत कोणत्याही गटातील लाभार्थी घेऊ शकतात. लाभार्थी हा दारिद्र्य रेषेखालील, भूमिहीन शेतमजूर, मागासवर्गीय अल्प व अत्यल्प भूधारक असणे आवश्यक आहे.
तलंगा गट वाटप : यामध्ये तलंगा गट वाटप अंतर्गत ८ ते १० आठवड्यांच्या २५ माद्या + ३ नर यांचेसाठी ५०% शासन अनुदान देते तसेच ५०% हिस्सा लाभार्थ्याला उभारावा लागतो. तलंगा गटासाठी लागणारा निवारा, वाहतुकीवरील खर्च, पाण्याची भांडी, खाद्याची भांडी, इ. खर्च करावा लागतो.
विशेष घटक योजनेंतर्गत ७५% अनुदानावर दुधाळ जनावरांच्या गटाचा पुरवठा
सदरील योजनेतून अनुसूचित जाती/नवबौद्ध लाभार्थींना प्रति लाभार्थी २ संकरित दुधाळ गायी/म्हशी यांचा ७५% शासकीय अनुदानावर पुरवठा करण्यात येतो.
विशेष घटक योजनेंतर्गत १००% अनुदानावर दुधाळ जनावरांना खाद्य पुरवठा
सदरील योजनेतून अनुसूचित जाती/नवबौद्ध लाभार्थींच्या गायी/म्हशींना १००% शासकीय अनुदानावर खाद्य पुरवठा करण्यात येतो. तसेच इतर शासकीय योजनेंतर्गतही जनावरांचा पुरवठा करण्यात आलेला असल्यास खाद्य पुरवठा करण्यात येतो.या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थीने जात प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, तसेच पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचे गाय व म्हैस तपासणी बाबतचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
विशेष घटक योजनेंतर्गत प्रशिक्षण
सदरील योजनेतून अनुसूचित जाती/नवबौद्ध लाभार्थ्यास ३ दिवसांचे पशुसंवर्धन विषयक निवासी प्रशिक्षण देण्यात येते. यामध्ये गायी/म्हशी/शेळ्या यांचे संगोपनांबाबत ज्ञान शेतकऱ्यांना दृकश्राव्य माध्यमातून तसेच विविध प्रकारचे पोस्टर्स / प्रत्यक्ष प्रक्षेत्रावरील भेटी या नुसार देण्यात येते. तसेच पुस्तकांचा पुरवठा करण्यात येतो.
केंद्र पुरस्कृत लाळखुरकुत रोगमुक्त पट्टा निर्माण करणे
केंद्र पुरस्कृत लाळखुरकुत रोगमुक्त पट्टा योजनेंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व गोवर्गीय पशुधनास वर्षातून दोन वेळेस लाळखुरकुत लसीकरण करण्यात येते.
श्वानदंश लसपुरवठा
ग्रामीण भागातील पशूवैद्यकीय दवाखान्याशी किंवा तालुकास्तरावरील पशुधन विकास अधिकारी (वि), पंचायत समिती यांचेशी संपर्क साधून सदर योजनेबाबत विस्तृत माहिती मिळविता येईल.
पशुसंवर्धन विभागांतर्गत विविध योजनांचे अर्ज - सन २०१७-१८
पशुसंवर्धन विभागातील विविध योजनांचे अर्ज हे दि. ०९ ऑगस्ट २०१७ पर्यंत पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती स्तरावर स्वीकारले जातील.
सेवा जेष्ठता यादी
पशुसंवर्धन विभाग : सहाय्यक पशुधन विकास अधिकारी वर्ग-३ संवर्गाची दि ०१.०१.२०१९ ची तात्पुरती ज्येष्ठता सूची
पशुसंवर्धन विभाग : पशुधन पर्यवेक्षक वर्ग-३ संवर्गाची दि ०१.०१.२०१९ ची तात्पुरती ज्येष्ठता सूची
पशुसंवर्धन विभाग : पशुधन पर्यवेक्षक वर्ग-३ संवर्गाची दि ०१.०१.२०१९ ची तात्पुरती ज्येष्ठता सूची
माहितीचा अधिकार
नागरिकांची सनद
माहिती लवकरच प्रकाशित होईल.
इतर महत्वाचे
माहिती लवकरच प्रकाशित होईल.
विभागप्रमुख
श्री विजय फुनसे
जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी
पशुसंवर्धन विभाग
0240-2345483
dahoaurangabad@gmail.com