महिला व बालकल्याण विभाग
प्रस्तावना
शासन निर्णय दिनांक 24 जानेवारी 2014 व 19 जानेवारी 2021 चे शासन शुध्दीपत्रकानुसार जिल्हयातील ग्रामीण भागातील महिलांसाठी विविध योजना व उपक्रम विभागामार्फत राबविले जातात.
एकात्मिक बाल विकास सेवा योजना:
- केंद्र शासन पुरस्कृत एकात्मिक बाल विका सेवा योजना कार्यक्रम 2ऑक्टोबर 1975 पासून राष्ट्रपिता महात्मा गांधीच्या 106 व जयंती दिनी सुरू करण्यात आला.
- छत्रपती संभाजीनगर जिल्हयात एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत ग्रामीण भागात एकूण 14 प्रकल्प कार्यरत आहेत.
- जिल्हयात 14 प्रकल्पांतर्गत मोठया 2700 व मिनी 806 अंगणवाडया कार्यरत आहेत.
- अंगणवाडीतील 0 ते 6 वर्षे वयोगटातील बालके,गरोदर व स्तनदा माता,किशोरवयीन मुली यांना खालील सेवा पुरविण्यात येतात.
- पुरक पोषण आहार
- आरोग्य व पोषण शिक्षण
- पूर्व प्राथमिक शिक्षण
- लसीकरण
- संदर्भ सेवा
- आरोग्य तपासणी
- एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे उददेश:-
- 0 ते 6 वर्षे वयोगटातील मुलांचा पोषण व आरोग्य दर्जा सुधारणे.
- मुलांचा योग्य मानसिक, शारिरीक व सामाजिक विकासाचा पाया घालणे.
- बालमृत्यु, बालरोगाचे व कुपोषणाचे प्रमाण कमी करणे.
- बाल विकासाला चालना मिळावी म्हणून विविध विभागाच्या धोरण व अंमलबजावणी याबाबत परिणामकारक समन्वय साधणे.
- योग्य पोषण व आरोग्य विषयक शिक्षणाद्वारे बालकांचे सर्वसामान्य आरोग्य व त्यांच्या पोषण विषयक गरजांकडे लक्ष पुरविण्याबाबत मातांची क्षमता वाढवणे.
पदांचा तपशील
योजना व उपक्रम
जि. प. उपकर योजना
अ.क्र | योजनेचे नाव | लाभार्थी निवडीचे निकष |
---|---|---|
१ | अंगणवाडी कार्यकर्ती पुरस्कार योजना | अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिका यांची कर्तव्य सूचीनुसार कामे वर्षातील उपजत मृत्यू, अर्भक मृत्यू, मातामृत्यू, आरोग्य तपासणी, पूरक पोषण आहार वाटपाची टक्केवारी यानुसार निवड. |
२ | दुर्धर आजारी मुलांच्या शस्त्रक्रियेसाठी अर्थसहाय्य व विविध योजना राबविणेसाठी फॉर्म छपाई | - |
३ | अंगणवाडीसाठी स्वतंत्र इमारत भाडे | - |
४ | अंगणवाड्यांसाठी साहित्य सुविधा पुरविणे (टेबल-खुर्ची खरेदी) |
|
५ | १०० टक्के अनुदानावर ७ वी ते १२ वी पास मुलींना संगणक (MS-CIT) प्रशिक्षण देणे. |
|
६ | मुलींना व महिलांना व्यावसायिक व तांत्रिक प्रशिक्षण (९० टक्के अनुदानावर) संगणक टायपिंग प्रशिक्षण |
|
विभागामार्फत राबविण्यात येणारे नाविन्यपूर्ण उपक्रम
- तीव्र कमी वजनाच्या बालकांसाठी होमबेस व्ही सीडीसी करण्यात येते.
- महिन्याच्या प्रत्येक शनिवारी प्रभावी माता बैठका घेण्यात येतात. व त्यांना आहार व आरोग्य बाबत मार्गदर्शन करण्यात येते.
- विभामार्फत मुठभर धान्य योजना राबविण्यात येते व जमा झालेल्या धान्यातून अंगणवाडीतील बालकांसाठी गोपाळपंगत उपक्रम राबविण्यात येतो.
- अंगणवाडीत बालकांसाठी बाळकोपरा उपक्रम राबविला जातो.
- आहार व पाककृती प्रदर्शने
लोकसहभागातून जिल्ह्यात
- मोबाईल व्हॅनद्वारे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ७५० गावांमध्ये महिला व बालकल्याण विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या योजनांचा प्रसार व प्रचार पंचसूत्री कार्यक्रमाची प्रसिद्धी.
- स्तनपान सप्ताह व पोषण सप्ताह साजरा
- १४ ते १९ नोव्हेंबर २०१४ या कालावधीत बालस्वच्छता अभियान
- आहारप्रदर्शन
- तीव्र कमी वजनाच्या मुलांसाठी होमबेस व्हीसीडीसी
- अंगणवाडीतील मुलांसाठी बाळकृष्ण कोपरा उपक्रम
- जिल्ह्यातील प्रत्येक अंगणवाडी केंद्रामध्ये गोपाळपंगत उपक्रम
- प्रत्येक अंगणवाडी केंद्रामध्ये दशपदी व द्विपदीचा प्रसार व प्रचार
लोकसहभागातून जिल्ह्यात
- बालरोगतज्ञामार्फत बालकांची आरोग्य तपसणी शिबीर व आजारी बालकांवर उपचार
- स्त्रीरोगतज्ञामार्फत गरोदर महिलांची आरोग्य तपासणी
- हिरकणी कक्षाची स्थापना
- मुठभर धान्य योजना
- आंगणवाडीतील मुलांसाठी बाळकोपरा उपक्रम
- जिल्ह्यातील प्रत्येक आंगणवाडीमध्ये गोपाळपंगत उपक्रम
योजनेचे नाव : बेटी बचाओ, बेटी पढाओ
- 1. योजनेचा उद्देश :
- मुलींच्या जन्माचे प्रमाण वाढविणे.
- स्त्री-भ्रुण हत्या रोखणे.
- मुलींना खात्रीचे शिक्षण.
- मुलींच्या जन्माची सुरक्षितता.
- 2. बेटी बचाओ, बेटी पढाओ अंतर्गत जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्यांमध्ये गुड्डा-गुड्डी बोर्ड लावण्यात आलेले आहेत. स्त्री-भ्रुण हत्या रोखण्यासाठी, मुलींच्या जन्माचे प्रमाण वाढविण्यासाठी, स्त्री जन्माचे स्वागत, मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रबोधन करण्यात येते.
सेवा जेष्ठता यादी
माहितीचा अधिकार
नागरिकांची सनद
इतर महत्वाचे
माहिती लवकरच प्रकाशित होईल.
विभागप्रमुख
श्रीमती सुवर्णा जाधव
उप मुख्य कार्यकारी अधिकारी
महिला व बालकल्याण विभाग
0240-2346130,8275265471
icdszpabd@gmail.com