विभाग
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा
सामान्य प्रशासन विभाग
वित्त विभाग
ग्राम पंचायत विभाग
महिला व बालकल्याण विभाग
महात्मा गांधी ग्रा. रोजगार हमी योजना विभाग
पाणी व स्वच्छता विभाग
ग्रामीण पाणी पुरवठा विभाग
बांधकाम विभाग
लघुसिंचन विभाग
आरोग्य विभाग
पशुसंवर्धन विभाग
शिक्षण विभाग (प्राथमिक)
शिक्षण विभाग (माध्यमिक)
कृषी विभाग
समाज कल्याण विभाग
छत्रपती संभाजीनगर चा जिल्ह्याविषयी
छत्रपती संभाजीनगर जिल्हा महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा विभागातील महत्त्वाचा जिल्हा आहे. हा जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या मध्यभागी असून छत्रपती संभाजीनगर ला मराठवाड्याचे द्वार संबोधले जाते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या उत्तरेला जळगाव जिल्हा आहे. तसेच पूर्वेला जालना जिल्हा असून दक्षिणेला बीड व नगर जिल्हा तसेच पश्चिमेला नाशिक हा जिल्हा आहे.
दृष्टीक्षेपात छत्रपती संभाजीनगर
एकूण भौगोलिक क्षेत्रफळ | १०,१३०.८९ चौकिमी |
---|---|
२०११ च्या जनगणनेनुसार एकूण लोकसंख्या | ३७,०१,२८२ |
ग्रामीण लोकसंख्या | २०,८१,११२ |
जिल्हयाची लोकसंख्या घनता | ३६६ |
लिंग गुणोत्तर | ९२३ |
बाल लिंग गुणोत्तर | ८५८ |
साक्षरता दर | ७९.०२% |
एकूण तालुके | ०९ |
एकूण गावे | १३५६ |
एकूण ग्रामपंचायती | ८६१ |
एकूण सरासरी पर्जन्यमान | ७२५.८ मिमी |
जिल्ह्यातील तालुके
तालुके | पिन कोड |
---|---|
छत्रपती संभाजीनगर | ४३१००१ |
खुलताबाद | ४३११०९ |
सोयगांव | ४३११०३ |
सिल्लोड | ४३११०१ |
गंगापूर | ४३११०७ |
कन्नड | ४३११११ |
फुलंब्री | ४३१११२ |
पैठण | ४३११२० |
वैजापूर | ४२३७०१ |
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ९ तालुके आहेत. तसेच या ९ तालुक्यांमध्ये एकूण १३५६ गावे आहेत.
इतिहास
सन १६१० मध्ये निजामशहाचा सरदार मलिक अंबर याने छत्रपती संभाजीनगर शहर वसविले. छत्रपती संभाजीनगरला दरवाजांचे शहर म्हटले जाते. मुघल बादशहा औरंगजेब याने आपली राजधानी छत्रपती संभाजीनगर येथे आणली त्यावेळी ५४ रस्ते भिंतीच्या सहाय्याने जोडण्यात आले. सन १६८२ मध्ये मराठ्यांपासून संरक्षण व्हावे म्हणून मोठी भिंत बांधली गेली. या भिंतीला मुख्य आणि उपमुख्य असे एकूण ५४ दरवाजे बनविण्यात आले. पिण्याच्या पाण्यासाठी १४ नहरी बांधल्या त्यातील दोन नहरी अजून चालू आहेत. औरंगजेब त्याच्या मृत्युपर्यंत छत्रपती संभाजीनगर येथेच राहिला. औरंगजेबाच्या मृत्युनंतर छत्रपती संभाजीनगर शहर, हैदराबाद निजामाच्या राजवटीत सामिल झाले. भारताच्या स्वातंत्र्यानंतर १७ सप्टेंबर १९४८ रोजी हैदराबाद हे निजामाकडून मुक्त झाले. १ नोव्हेंबर १९५६ रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह मराठवाडा हा विभाग हैदराबाद राज्यातुन तत्कालीन बॉम्बे राज्यात विलीन झाले.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर तालुक्यात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, विभागीय आयुक्तालय, जिल्हाधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका, बीबी का मकबरा, दौलताबाद येथील देवगिरी किल्ला, पानचक्की, बुध्द लेणी, मुघलकालीन एकूण ५२ दरवाजे, इ. आहेत तर सोयगाव तालुक्यातील अजिंठा गावात जगप्रसिद्ध अजिंठा लेणी आहे आणि खुलताबाद तालुक्यातील वेरूळ गावात जगप्रसिद्ध वेरूळ लेणी आणि घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग, पैठण येथे संत एकनाथ महाराजांचे समाधीस्थळ, जायकवाडी धरण याच जिल्ह्यात आहेत.
छत्रपती संभाजीनगर जिल्हा हा भारतातील एकमेव जिल्हा आहे, ज्यात २ जगप्रसिद्ध हेरिटेज वास्तू (अजिंठा लेणी व वेरूळ लेणी) आहेत. जिल्ह्यातील पैठण हे ऐतिहासीक शहर पैठणी साड्यांसाठी प्रसिद्ध आहे. तसेच जिल्ह्यातील हिमरू शाल प्रसिद्ध आहे.
छत्रपती संभाजीनगर येथे संक्रांतीला पतंगबाजी रंगते. येथील पतंग देशभरात उडविले जातात. येथील पतंगांचे वैशिष्ट्य म्हणजे हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्यात आकाशात चांगल्या प्रकारे उडू शकतात.
जिल्ह्याचे क्षेत्रफळ १०१०० चौ.कि.मी असून लोकसंख्या ३७.०१ लाख इतकी आहे.
जिल्ह्यातील प्रमुख पीके- कापूस, बाजरी, मका, तूर, मूग, ज्वारी, गहू
जिल्ह्यातील प्रमुख नद्या- गोदावरी, तापी, पूर्णा
जिल्ह्यातील पर्यटनस्थळे
अजंठा - वेरूळ लेण्या : ५ व्या - ८ व्या शतकात गुफेत साकारलेल्या लेण्या
दौलताबाद किल्ला : मोहम्मद तुघलकाची राजधानी
खुलताबाद : मुघल बादशहा औरंगजेबाची कबर
बीबी का मकबरा : बेगम राबीयाची (बादशहा औरंगजेबाच्या पत्नीची) कबर
घृष्णेश्वर मंदीर : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक (बारावे ज्योतिर्लिंग)
पाणचक्की
पैठण : संत एकनाथ यांचे गाव
जायकवाडी धरण : नाथसागर
छत्रपती संभाजीनगर गुफा आणि छत्रपती संभाजीनगर लेणी
५२ दरवाजे
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी यांची माहिती
राजकीय संरचना
लोकसभा मतदारसंघ : छत्रपती संभाजीनगर, कन्नड, खुलताबाद, गंगापूर, वैजापूर, सिल्लोड हे सहा विधानसभा मतदारसंघ मिळून छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ तयार झाला आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण, फुलंब्री व सोयगाव हे तीन विधानसभा मतदारसंघ जालना लोकसभा मतदारसंघाला जोडण्यात आले आहेत.
विधानसभा मतदारसंघ : जिल्ह्यात अकरा विधानसभा मतदारसंघ आहेत- छत्रपती संभाजीनगर (मध्य), छत्रपती संभाजीनगर (पुर्व), छत्रपती संभाजीनगर (पश्चिम), कन्नड, खुलताबाद, गंगापूर, वैजापूर, सिल्लोड, पैठण, फुलंब्री व सोयगाव.
जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे ६० मतदारसंघ आहेत, तर पंचायत समितीचे १२० मतदारसंघ आहेत.
महानगर पालिका मतदारसंघ : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात छत्रपती संभाजीनगर या तालुक्यातील छत्रपती संभाजीनगर शहरात छत्रपती संभाजीनगर महानगर पालिका आहे. त्यात महानगर पालिकेचे ११३ आणि शहरात नव्याने समाविष्ट झालेले सातारा व देवळाई परिसर हे ०२ असे एकूण ११५ मतदारसंघ आहेत.
उद्योग
जिल्ह्यात छत्रपती संभाजीनगर तालुक्यात वाळूज, चिकलठाणा, शेंद्रा या ठिकाणी तसेच पैठण तालुक्यात औद्योगिक वसाहती आहेत. शेंद्रा औद्योगिक वसाहत हि पंचतारांकित औद्योगिक वसाहत आहे. या औद्योगिक वसाहतींमध्ये ऑटोमोबाईल, औषध निर्माण, रासायनिक, मद्य निर्माण क्षेत्रातील अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत. चिकलठाणा येथे एक आय.टी. पार्क आहे. याव्यतिरिक्त जिल्ह्यात अनेक कंपन्यांचे कॉल सेन्टर्स तसेच छोट्या आय.टी. कंपन्या सुद्धा आहेत.
छत्रपती संभाजीनगरला कसे पोहोचाल?
छत्रपती संभाजीनगर ला येण्यासाठी महामार्ग, लोहमार्ग आणि हवाई मार्ग असे विविध पर्याय उपलब्ध आहेत.
महत्त्वाचे महामार्ग
मुंबई - छत्रपती संभाजीनगर
हैदराबाद - छत्रपती संभाजीनगर
नागपूर - छत्रपती संभाजीनगर
पुणे - छत्रपती संभाजीनगर
लोहमार्ग
मुंबई - छत्रपती संभाजीनगर
हैदराबाद - नांदेड - छत्रपती संभाजीनगर
सिकंदराबाद - बंगळूरू - परभणी - छत्रपती संभाजीनगर
हवाई मार्ग
दिल्ली - मुंबई - छत्रपती संभाजीनगर
मुंबई - छत्रपती संभाजीनगर
छत्रपती संभाजीनगर पासून इतर महत्त्वांच्या शहरातील अंतर
छत्रपती संभाजीनगर-मुंबई : ३३४ किमी
छत्रपती संभाजीनगर-नाशिक : १८२ किमी
छत्रपती संभाजीनगर-पुणे : २३५ किमी
छत्रपती संभाजीनगर-नागपूर : ४७८ किमी
छत्रपती संभाजीनगर-इंदोर : ४१० किमी
छत्रपती संभाजीनगर-सुरत : ३७६ किमी
छत्रपती संभाजीनगर-दिल्ली : १२५६ किमी
छत्रपती संभाजीनगर-हैदराबाद : ५४० किमी