जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा
प्रस्तावना
केंद्र पुरस्कृत योजनांच्या अंमलबजावणीसाठी राज्यात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा या संस्थेची स्थापना Registration of Society ACT १८६० व मुंबई सार्वजनिक विश्वस्त अधिनियम १९५० अन्वये करण्यात आलेली आहे.
जि.ग्रा.वि.यं. मार्फत दारिद्र्य रेषेखालील जनतेचा आर्थिक स्तर उंचावण्याकरिता विविध योजना राबविल्या जातात. त्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून अर्थ साहाय्य उपलब्ध करून दिले जाते. सदर योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी होणे करिता शासन निर्णय क्र. जिग्रा २००३/प्र.क्र. १७४३/ योजना - ५ मंत्रालय, मुंबई ४०००३२ अन्वये नवीन कृतीबंध लागू केला आहे.
विभागाची महत्त्वाची कार्ये:
- केंद्र शासन पुरस्कृत योजनांची अंमलबजावणी करणे.
- दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना वैयक्तिक व सामुहिक योजनांमध्ये लाभ देणे.
- दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांची स्वरोजगारासाठी कर्ज प्रकरणे हाताळणे.
- लाभार्थींना आपले उत्पन्न वाढविता यावे यासाठी गुंतवणूक किंवा उत्पादक उद्योग धंदे काढण्याच्या दृष्टीने आदर्श योजना तयार करणे.
पदांचा तपशील
पदनाम | मंजुर पदे | भरलेली पदे | रिक्त पदे |
---|---|---|---|
प्रकल्प संचालक (वर्ग १) | ०१ | ०१ | ०० |
सहाय्यक प्रकल्प अधिकारी (सनियंत्रण) (वर्ग २) | ०१ | ०१ | ०० |
कनिष्ट अभियंता / शाखा अभियंता (वर्ग ३) | ०१ | ०० | ०१ |
सहाय्यक लेखाधिकारी (वर्ग ३) | ०१ | ०१ | ०० |
वरिष्ठ लेखा (लिपिक)(वर्ग ३) | ०१ | ०१ | ०० |
विस्तार अधिकारी (सांख्यिकी) (वर्ग ३) | ०१ | ०१ | ०० |
वरिष्ठ सहाय्यक (वर्ग ३) | ०१ | ०१ | ०० |
कनिष्ठ सहाय्यक (वर्ग ३) | ०३ | ०३ | ०० |
वाहनचालक (वर्ग ३) | ०२ | ०० | ०२ |
परिचर (वर्ग ४) | ०२ | ०२ | ०० |
एकूण | १५ | ११ | ०४ |
योजना व उपक्रम
डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी राष्ट्रीय रुरबन मिशन
डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी राष्ट्रीय रुरबन मिशन अभियानाची उद्दिष्टे
डॉ.डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी राष्ट्रीय रुरबन मिशन अभियानाची अहवाल
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणे मार्फत घरकुलांसाठी राबविण्यात येणा-या योजना
उमेद - महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान
उमेद - महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियांनांतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना
सेवा जेष्ठता यादी
माहिती लवकरच प्रकाशित होईल.
माहितीचा अधिकार
नागरिकांची सनद
इतर महत्वाचे
माहिती लवकरच प्रकाशित होईल.
विभागप्रमुख
श्री. अशोक सिरसे
प्रकल्प संचालक
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा
0240-2337774
abdprodir@rediffmail.com