पंचायत विभाग हा जिल्हा परिषद अंतर्गत असुन सदर विभाग हा
ग्रामसेवक
संवर्गाची जिल्हास्तरीय आस्थापना आहे. या विभागामार्फत जिल्ह्यातील
सर्व ग्रामपंचायातींवर नियंत्रण ठेवण्यात येते.
या विभागामार्फत शासनाच्या विविध योजना पंचायत विभागाशी संबंधित
ग्रामपंचायतीमार्फत राबविल्या जातात. त्याबाबत नियंत्रण व आढावा घेतला
जातो.
पंचायत विभागाचे महत्त्वाचे कार्य:
सरपंच, सदस्य व ग्राम पंचायत कर्मचारी यांचे
मानधन वितरीत करणे.
जमीन महसूल अनुदान, मुद्रांक शुल्क अनुदान
यांचे वितरण व हिशेब ठेवणे.
जिल्हा ग्राम विकास निधीमधून गरजु ग्राम
पंचायतींना विविध विकास कामांना अल्प दराने कर्ज देणे, त्या
कर्जाची वसुली करणे, व त्यासंबंधीचे अभिलेखे ठेवणे.
ग्राम पंचायतींमार्फत वसूल करण्यात येणारे
कर, घरपट्टी, पाणी पट्टी, वीज पट्टी, तसेच कारखाना कर वसुलीबाबत
ग्राम पंचायतीचा आढावा घेणे व त्या बाबतची माहिती शासनास कळविणे.
या विभागामार्फत वैयक्तिक लाभांच्या कोणत्याही प्रकारच्या
योजनांची अंमलबजावणी केली जात नाही.
आय.एस.ओ. (I.S.O. Certificate) प्रमाणपत्र प्राप्त ग्राम पंचायत जिल्हा
परिषद, छत्रपती संभाजीनगर अंतर्गत येणाऱ्या
८६१ ग्राम पंचायातींपैकी ११३ ग्राम पंचायती या आय.एस.ओ. (I.S.O.
Certified) मानांकन प्रमाणित आहेत.
अ. क्र.
संवर्ग
लोकसंख्या
एकूण ग्रा.पं. संख्या
ISO प्राप्त ग्रा.पं. संख्या
१
कन्नड
३००२६०
१३७
१४
२
वैजापूर
२७००७५
१३५
१४
३
छत्रपती संभाजीनगर
३४५८९९
११४
१६
४
गंगापूर
३३०२५१
११०
०९
५
पैठण
३०६४३७
१०७
१८
६
सिल्लोड
३०१७३३
१०३
१६
७
फुलंब्री
१४४९३१
७०
१२
८
सोयगाव
१०५७२७
४६
०७
९
खुलताबाद
१०१९९५
३९
०७
पदांचा तपशील
माहिती लवकरच
प्रकाशित
होईल.
योजना व उपक्रम
योजनेचे नाव: सौर अभ्यासिका योजना
योजनेचे स्वरूप:
या योजनेंतर्गत दिवे प्रकार ४ मध्ये ५ वॅट
क्षमतेचे एल.ई.डी. दिव्यांचा पुरवठा केला जातो.
९०% रक्कम महाउर्जा, पुणे यांचेकडून
पुरवठादारास अदा करण्यात येते. १०% रक्कम ग्रामपंचायातीस भरणा
करावा लागतो.
प्रत्येक ग्रामपंचायातीस १ सौर अभ्यासिका
ग्रामपंचायत कार्यालयात आस्थापित केली जाते.
सदर सौर अभ्यासिका हमी कालावधी ५ वर्षांचा
असून देखभाल व दुरुस्ती ग्रामपंचायातीस करावी लागते.
सदर कामांसाठी पुरवठादाराचे नाव महाउर्जा,
पुणे यांचेकडून देण्यात येते
योजनेचे नाव: सौर पथदिवे योजना
योजनेचे स्वरूप:
सदर योजनेसाठी पर्यावरण संतुलीत समृध्द
ग्रामयोजनेमधील पात्र ग्रामपंचायतींची निवड शासन स्तरावरुन केली
जाते.
सन २०१३-१४ वर्षासाठी छत्रपती संभाजीनगर
जिल्हयातील
४६ ग्रामपंचायतींची निवड झालेली असुन प्रत्येक ग्रामपंचायतीस ३
सौर पथदिवे आस्थापीत केले जाते.
ग्रामपंचायत हिस्सा रक्कम
३५२९/-
राज्य हिस्सा रक्कम
८८२०/-
केंद्र हिस्सा रक्कम
५२९२/-
एकूण
१६७४१/-
सौर पथदिव्यांचा हमी कालावधी ५ वर्षाचा असून
मॉडेलची वॉरंटी १० वर्षाची आहे.
सदर कामासाठी एजन्सीची निवड शासन स्तरावरून
केली जाते.
योजनेचे नाव: उर्जा कार्यक्षम पथदिवे योजना
योजनेचे स्वरूप:
९० टक्के आुदानानावर ग्रामपंचायतीला
तांत्रीक दृष्ट्या योग्य असलेले ५० ते ६० टक्के विज बचत करणारे २०
वॅटचे सी.एफ.एल. बल्ब बसविले जाते. ग्रामपंचायतीस १० टक्के
लाभार्थी हिस्सा भरणा करावा लागतो. एका ग्रामपंचायतीस कमीतकमी १५
नग ते ३० नग अस्थापीत किंवा पुरवठा केला जातो.
ग्रामपंचायतीची लोकसंख्या ५ हजार किंवा
त्यापेक्षा अधिक लोकसंख्या असलेली गावे, शासनाच्या विविध योजनेच्या
सहभागी झालेली गावे, उदा. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान,
पर्यावरण संतुलीत समृध्द ग्राम योजना, अक्षय प्रकाश ग्रामयोजना,
तंटा मुक्ते गांवे, कर वसुली १०० टक्के झालेली आहे, अशा गावांची
यांची प्राधान्याने निवड केली जाते.
सन २०१३-१४ साठी जिल्हयातील २३
ग्रामपंचायतींची निवड केलेली असून ५०० नगांची उर्जा कार्यक्रम
पथदिवे अस्थापीत करण्यात आलेली आहे.
सन २०१४-१५ वर्षासाठी ग्रामपंचायतीनिहाय
मागणीसाठी गट विकास अधिकारी सर्व यांना पत्रे दिलेली आहे.
सदर कामांसाठी पुरवठाधारकाचे नांव महाउर्जा,
पुणे यांचेकडून देण्यात येते.
योजनेचे नाव: अल्पसंख्याक बहुल ग्रामीण क्षेत्रात
मूलभूत/ पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देणे.
राज्यातील अल्पसंख्याक बहुल ग्रामीण
क्षेत्रात मुलभूत/ पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देऊन ग्रामीण भागात
वास्तव्यास असलेल्या अल्पसंख्याक लोकसमुहातील नागरीकांच्या
जीवनमानाचा दर्जा उंचावण्यासाठी ग्रामीण क्षेत्र विकास कायर्क्रम
सन २०१३-१४ या वर्षापासून नव्याने कार्यान्वित करण्यात आला आहे.
सेवा जेष्ठता यादी
संदर्भिय नियमान्वये ग्रामविकास अधिकारी या संवर्गाची
दिनांक ०१/०१/२०२४ रोजीची तात्पुरती ज्येष्टता सुची या सोबत प्रसिध्द
करण्यात येत आहे.
संदर्भिय नियमान्वये ग्रामसेवक या संवर्गाची दिनांक
०१/०१/२०२४ रोजीची तात्पुरती ज्येष्ठता सुची या सोबत प्रसिध्द करण्यात
येत आहे.
संदर्भिय नियमान्वये विस्तार अधिकारी (पं) या संवर्गाची
दिनांक ०१/०१/२०२४ रोजीची तात्पुरती ज्येष्ठता सुची या सोबत प्रसिध्द
करण्यात येत आहे.