ग्रामीण पाणी पुरवठा विभाग
प्रस्तावना
ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याची जबाबदारी मुंबई ग्राम पंचायत अधिनियामाप्रमाणे संबंधित ग्राम पंचायतीची आहे. त्यामुळे ग्राम पंचायतींना तांत्रिक मार्गदर्शन तालुका व जिल्हा पातळीवर होण्याच्या दृष्टीकोणातून ग्रामीण पाणी पुरवठा विभागाची निर्मिती जिल्हा स्तरावर झाली आहे. सदर विभागांतर्गत छत्रपती संभाजीनगर, गंगापुर, पैठण, सिल्लोड, खुलताबाद या तालुक्याच्या स्तरावर ५ उपविभाग असुन, छत्रपती संभाजीनगर येथे एक यांत्रिकी उपविभाग आहे.
महत्त्वाची कार्ये:
ग्रामीण पातळीवरील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा योजना तयार करणे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत तयार करण्यात आलेल्या व जि.प. कडे हस्तांतरित असलेल्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनाची देखभाल करणे.
टंचाई कालावधीत तात्पुरती पूरक पाणी पुरवठा योजना, नळ योजना, विशेष दुरुस्ती, खाजगी विहीर अधिग्रहण, टँकर लावणे, इ. कामे.
ग्रामीण भागातील शाळांना पाणीपुरवठा करणे.
उच्च क्षमतेच्या विंधन विहिरींवर विद्युत पंप बसविणे.
संरचना:
जिल्हास्तरावर कार्यकारी अभियंता यांचे अधिपत्याखाली या विभागात कामकाज चालते. कार्यकारी अभियंता यांचे अधिपत्याखाली जिल्ह्यात ग्रामीण पाणीपुरवठा कार्यक्रम राबविणेसाठी १ ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, १ यांत्रिकी उपविभाग, ५ ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग अस्तित्वात आहे.
तालुका स्तरावरील उप अभियंता, पाणी पुरवठा उप विभाग | ||||
---|---|---|---|---|
अ. क्र. | अधिकाऱ्यांचे नाव | पदाचे नाव | कार्यालयाचा दूरध्वनी क्र. | भ्रमणध्वनी क्र |
१ | श्री पी. आर. डोंगरे | उप अभियंता, छत्रपती संभाजीनगर उपविभाग | - | ९८२२२८६४७२ |
२ | श्री ए. ए. जाधव | उप अभियंता, पैठण उपविभाग21 | - | ९४२०७६१०५८ |
३ | श्री आर. एस. शिंदे | उप अभियंता, गंगापूर उपविभाग | - | ९४२३७३३६४४ |
४ | श्री ए. एम. घुगे | उप अभियंता, वैजापूर उपविभाग | - | ९४२२२३०६१९ |
५ | श्री आर. जे. कोयलवार | उप अभियंता, सिल्लोड उपविभाग | - | ९४२२२३०६१९ |
६ | अधिकाऱ्यांचे नाव | उप अभियंता (प्र), खुलताबाद उपविभाग | - | ९४२२२३०६१९ |
पदांचा तपशील
मुख्यालयातील पदांचा तपशील
अ. क्र. | तपशील | मुख्यालयातील मंजुर पदे | |||
---|---|---|---|---|---|
मंजुर पदे | भरलेली पदे | रिक्त पदे | रिक्त पदे | ||
छत्रपती संभाजीनगर | का. अ. | ०१ | ०१ | - | शासनाची पदे |
स.भू.वै. | ०१ | ०१ | - | शासनाची पदे | |
क.भू.वै. | ०२ | ०१ | ०१ | शासनाची पदे | |
स.ले.अ. | ०१ | ०१ | - | जि. प. चे पद | |
शा.अ. | ०४ | ०४ | - | जि. प. चे पद | |
आरेखक | ०१ | -- | ०१ | जि. प. चे पद | |
व.स.ले. | ०१ | ०१ | ०१ | जि. प. चे पद | |
वरिष्ठ सहाय्यक | ०५ | ०३ | ०२ | जि. प. चे पद | |
कनिष्ठ सहाय्यक | ०६ | ०६ | - | जि. प. चे पद | |
वाहन चालक | ०१ | ०१ | - | जि. प. चे पद | |
परिचर | ०६ | ०६ | - | जि. प. चे पद | |
एकूण | ३० | २६ | ४ |
योजना व उपक्रम
यांत्रिकी उपविभाग
विंधन विहीर कार्यक्रम
मा. जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने टंचाईग्रस्त भागात शासन निर्णयानुसार विंधन विहीर घेण्यात येतात. तसेच स्थानिक विकास कार्यक्रम, विशेष घटक योजना, इत्यादी विविध योजने अंतर्गत संपूर्ण जिल्हामध्ये सक्षम प्राधिकरणाची मंजुरीनुसार विंधन विहिरीवर हातपंप बसविण्याचे काम करण्यात येते.
हातपंप देखभाल व दुरुस्ती योजना
जिल्ह्यात ५७३६ हातपंप कार्यान्वित असून हातपंप देखभाल व दुरुस्तीसाठी प्रत्येक तालुक्यमध्ये संबधित गट विकास अधिकारी यांचे नियंत्रणाखाली पथक नेमण्यात आलेले आहे.प्रत्येक पथकात वाहन, कर्मचारी व साहित्य औजारेसह उपलब्ध आहे.
ज्या ग्रामपंचायतीने पंचायत समितीकडे हातपंप / वीजपंप देखभाल व दुरुस्तीसाठी करारनामा करतात त्यांची देखभाल व दुरुस्ती पथकामार्फत करण्यात येते.
हातपंप / वीजपंप देखभाल व दुरुस्तीसाठी प्रत्येक ग्रामपंचायतीकडून वार्षिक प्रति हातपंप २८००/- व प्रति वीजपंप ६५००/- रुपये वसूल करून जिल्हा परिषद देखभाल व दुरुस्ती निधीत जमा करण्यात येते.
योजनेकडील कर्मचारी वर्गाचे वेतन भत्ते, वाहनासाठी इंधन पुरवठा व दुरुस्ती, हातपंप दुरुस्तीसाठी आवश्यक असणारे सुटेभाग, पाईप व इतर साहित्य यासाठी लागणारा सर्व खर्च जिल्हा परिषदेच्या देखभाल व दुरुस्ती निधीमधून भागविण्यात येतो.
विंधन विहीर फ्लशिंग
ग्रामपंचायतीच्या मागणीप्रमाणे व फिस आकारून दगड, गाळ व मुळ्या आलेल्या यशस्वी विंधन विहिरीचे फ्लशिंगचे काम शासकीय विंधन यंत्राद्वारे केल्या जाते.
प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना देखभाल व दुरुस्ती
जिल्हामध्ये १७ प्रादेशिक पाणी पुरवठा योजना कार्यान्वित असून पाणी पुरवठा उपविभागाच्या मागणी नुसार यांत्रिकी स्वरुपाची कामे (विद्युत पंप रिवायंडिंग व दुरुस्ती) करण्यात येते.
सौरउर्जा पंपाचा (Solar Pump) वापर करून विंधन विहिरीवर आधरित लघु नळ पाणी पुरवठा योजना. भौगोलिक परिस्थितीमुळे वीज पुरवठा घेणे आर्थिक दृष्ट्या किफायतशीर नसलेल्या व केवळ विंधन विहिरीवर अवलंबून असलेल्या गाव / वाड्या / वस्त्यांवर सौरउर्जा पंपाचा वापर करून लघु नळ पाणी पुरवठा योजना राबविण्यात येते. अस्तित्वातील उच्च क्षमतेच्या विंधन विहिरीवर सौर ऊर्जेवरील ७५० ते ९०० वॅट चा एसी/ डीसी पंप संच हातपंपासह बसविण्यात येतो. या पंपासाठी आवश्यक सौर पॅनल्स, सुरक्षेसाठी लोखंडी जाळीसह विंधन विहीर नजीक उभारणी करण्यात येते. सौर पंपाने उपसा करून ५००० लि. क्षमतेच्या टाकीमध्ये पाणी साठविण्यात येऊन नळाद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतो.सदर योजनेसाठी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमार्फत व वरिष्ठ भुवैज्ञानिक कार्यालयास निधी प्राप्त होतो.
योजनेची वैशिष्टे
एकाच विंधन विहिरीत हातपंप व सौरपंप दोन्ही कार्यरत असतात.
सौरपंपाद्वारे साठवण टाकीत पाणी, साठवण टाकीतून पाणी वितरण व्यवस्थेत.
उन्हाळ्यात पाण्याची पातळी खोल गेल्यामुळे हातपंप बंद पडल्यास सोलार पंपाद्वारे पाणी पुरवठा सुरळीत चालतो.
पावसाळ्यात सूर्यप्रकाश कमी पडल्यास (अंधारून आल्यास) रात्री अथवा संध्याकाळी हातपंपाद्वारे पाणी पुरवठा सुरळीत चालतो.
विजेच्या खर्चापासून मुक्ती मिळते.
विद्युतभार नियमनाची चिंता नाही. व पारंपारिक उर्जेचा वापर होतो.
सेवा जेष्ठता यादी
माहिती लवकरच प्रकाशित होईल.
माहितीचा अधिकार
नागरिकांची सनद
इतर महत्वाचे
माहिती लवकरच प्रकाशित होईल.
विभागप्रमुख
श्री. अजित वाघमारे
कार्यकारी अभियंता (पापु)
ग्रामीण पाणी पुरवठा विभाग
0240-2330649
eebnauaurangabad@gmail.com