बांधकाम विभाग
प्रस्तावना
बांधकाम विभागाचे प्राथमिक कार्य:
१९८१-२००० रस्ते विकास आराखड्यानुसार ग्रामीण भागातील रस्त्यांची सुधारणा करणे.
शासकीय निधी कामावर खर्च करताना उपलब्ध निधीनुसार खर्चावर नियंत्रण राखणे.
रस्त्यांचे डांबरीकरण, खडीकरण व मुरुमीकरण करणे, छोट्या मोऱ्या बांधणे, शाळा खोल्या बांधणे व किरकोळ स्वरूपाच्या दुरुस्तीची कामे करणे. तसेच आरोग्य, पशुसंवर्धन विभागाचे मुळ बांधकाम व दुरुस्तीची कामे तसेच अंगणवाड्या तसेच ग्रामपंचायत स्तरावरील कामे करणे.
उप अभियंता यांचेकडून विविध योजनांची व विविध स्तरावरील कामे करून घेणे. कामावर देखरेख करून कामे तांत्रिकदृष्ट्या योग्य होतात किंवा नाही ते पाहून त्यांना तांत्रिकदृष्ट्या मार्गदर्शन करणे.
शासनाच्या विविध योजना शासनाच्या मार्गदर्शक तत्वावर राबविणे. कामे प्रगतीपथावर राहण्यासाठी योग्य ती उपाय योजना करणे.
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या सर्व इमारतींची देखभाल व दुरुस्ती या विभागामार्फत केली जातात.
बांधकाम विभागाच्या कार्यक्षेत्रात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ९ तालुक्यांचा समावेश आहे. या ९ तालुक्यांमध्ये बांधकामाचे ५ उपविभाग कार्यरत असून त्यावर ०५ उप अभियंता व त्यांचे अधिनस्त शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता व इतर आवश्यक कर्मचारी वर्ग कार्यरत आहे.
विभागाची रचना
बांधकाम विभाग, जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर अंतर्गत विविध विकास कामांची माहिती
पदांचा तपशील
जिल्हा परिषद स्तरावर गट-क व गट-ड संवर्गातील रिक्त पदे (डिसेंबर २०१५)
अ. क्र. | तपशील | सरळसेवा | पदोन्नती | स्तंभ क्र. ०८ नुसार भरण्यात आलेली रिक्त पदे | ||||
---|---|---|---|---|---|---|---|---|
मंजुर पदे | भरलेली पदे | रिक्त पदे | मंजुर पदे | भरलेली पदे | रिक्त पदे | |||
०१ | ०२ | ०३ | ०४ | ०५ | ०६ | ०७ | ०८ | ०९ |
०२ | कनिष्ठ अभियंता | ५५ | ५५ | ०० | ५४ | ४३ | ११ | कनिष्ठ अभियंता हे ०१ पद कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) यांच्या पदातून मंजूर करण्यात आले आहे. |
०३ | स्था. अभियांत्रिकी सहाय्यक | १०६ | १०६ | ०० | ०० | ०० | ०० | |
०४ | मुख्य आरेखक | ०० | ०० | ०० | ०१ | ०१ | ०० | |
०५ | कनिष्ठ आरेखक | १० | ०४ | ०६ | ०० | ०० | ०० | |
०६ | कनिष्ठ अभियंता | ०१ | ०१ | ०० | ०० | ०० | ०० | |
०७ | कनिष्ठ अभियंता (विद्युत) | ०१ | ०१ | ०० | ०० | ०० | ०० | |
एकूण | १७५ | १६९ | ०६ | ५७ | ४४ | १३ |
योजना व उपक्रम
जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत खालील प्रमाणे योजनांचे नियोजन करण्यात येते. अ) जिल्हा वार्षिक योजना (D.P.D.C)
ग्रामिण रस्ते विकास, मजबुतीकरण व डांबरीकरण (3054).
इतर जिल्हा मार्ग विकास, मजबुतीकरण व डांबरीकरण (5054)
ग्रामिण तिर्थक्षेत्र विकास
पर्यटन स्थळ विकास / प्रधानमंत्री खनिजक्षेत्र
विकास योजना
ब) राज्यस्तरीय योजना (S/R Program)
रस्ते व पुल दुरस्ती. (लेखाशिर्ष 3054 2419) गट
अ ब क ड
क) प्रशासकीय इमारतीची देखभाल व दुरस्ती (SLR)
ड) जिल्हा परिषद उपकर
या शिवाय जि प अंतर्गत विविध खात्या मार्फत नियोजन करण्यात आलेली कामे जसे.
आरोग्य विभागाची कामे - आरोग्य विभागा मार्फत प्राथमिक आरोग्य केंद्र/उपकेंद्र बांधकाम व दुरुस्ती चे नियोजन करुन प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात येते व मंजुर काम पूर्ण करण्याची जबाबदारी बांधकाम विभागाची आहे.
शिक्षण विभाग - शिक्षण विभागा मार्फत प्राथमिक शाळा इमारत व माध्यमिक शाळा इमारत बांधकाम व दुरुस्ती च्या कामाना प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात येते व मंजुर कामे पूर्ण करण्याची जबाबदारी बांधकाम विभागाची आहे.
पशुसंवर्धन - पशुसवंर्धन खात्यामार्फत मंजुर करण्यात आलेले पशुवैदयकीय दवाखाना बांधकामाचे तांत्रिक मान्यता देणे,निविदा करणे,काम पुर्ण करणे,इत्यादी कामांची जबाबदारी बांधकाम विभागाची आहे.
2515 लोक प्रतिनिधींनी सुचविलेली कामे.
आमदार खासदार यांनी शिफारस केलेली कामे.
डोंगरी विकास कामे.
ग्राम सामाजिक परिवर्तन निधी (VSTF).
बाळासाहेब ठाकरे मातोश्री स्मुर्ती ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम..
सेवा जेष्ठता यादी
बांधकाम विभाग - छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदे अंतर्गत बांधकाम विभागा अंतर्गत कार्यरत असलेल्या तारतंत्री, तांत्रिक जिल्हा सेवा वर्ग-3 (दुय्यम अभियांत्रिकी) द्वितीय श्रेणी या संवर्गातील कर्मचा-यांची दिनांक 01/01/2024 ची तात्पुरती जेष्ठता सुची
बांधकाम विभाग - छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदे अंतर्गत बांधकाम विभागा अंतर्गत कार्यरत असलेल्या कनिष्ठ अभियंता जिल्हा सेवा वर्ग-3 श्रेणी-1 (बांधकाम/सिंचन/पाणी पुरवठा) या संवर्गातील कर्मचाऱ्यांची दिनांक 01/01/2024 ची तात्पुरती जेष्ठता सुची
बांधकाम विभाग - छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदे अंतर्गत बांधकाम विभागा अंतर्गत कार्यरत असलेल्या कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) तांत्रिक जिल्हा सेवा वर्ग-3 (दुय्यम अभियांत्रिकी) द्वितीय श्रेणी या संवर्गातील कर्मचा-यांची दिनांक 01/01/2024 ची तात्पुरती जेष्ठता सुची
बांधकाम विभाग - छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदे अंतर्गत बांधकाम विभागा अंतर्गत कार्यरत असलेल्या कनिष्ठ आरेखक जिल्हा सेवा वर्ग-3 (दुय्यम सेवा) श्रेणी-1 या संवर्गातील कर्मचाऱ्यांची दिनांक 01/01/2024 ची तात्पुरती जेष्ठता सुची
माहितीचा अधिकार
नागरिकांची सनद
माहिती लवकरच प्रकाशित होईल.
इतर महत्वाचे
माहिती लवकरच प्रकाशित होईल.
विभागप्रमुख
श्री सुखदेव काकड
कार्यकारी अभियंता (बांधकाम)(प्र)
बांधकाम विभाग
0240-2354344
zpworksaurangabad@gmail.com