अ-- | | अ++ | मुख्य विषयाकडे जा| English    

वृक्ष लावा बाळगा अभिमान, तरच वाढेल देशाची शान| Save water, it will save you later! पढेगा लीखेगा भारत, तो आगे बढेगा भारत| स्वच्छ भारत, स्वस्थ भारत| स्वच्छ भारत, सशक्त भारत| स्वच्छ भारत, समर्थ भारत| बेटी है कुदरत का उपहार, मत करो इसका तिरस्कार| एक पेड, एक जिंदगी| पाणी अडवा, पाणी जिरवा| Go Green to Keep it Clean| बेटी बचाओ, बेटी पढाओ| झाडे लावू या, झाडे जगवू या|

औरंगाबादचा जिल्ह्याविषयी

औरंगाबाद जिल्हा महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा विभागातील महत्त्वाचा जिल्हा आहे. हा जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या मध्यभागी असून औरंगाबादला मराठवाड्याचे द्वार संबोधले जाते. औरंगाबाद जिल्ह्याच्या उत्तरेला जळगाव जिल्हा आहे. तसेच पूर्वेला जालना जिल्हा असून दक्षिणेला बीड व नगर जिल्हा तसेच पश्चिमेला नाशिक हा जिल्हा आहे.

दृष्टीक्षेपात औरंगाबाद
एकूण भौगोलिक क्षेत्रफळ १०,१०० चौकिमी
२०११ च्या जनगणनेनुसार एकूण लोकसंख्या ३७,०१,२८२
ग्रामीण लोकसंख्या २०,८१,११२
एकूण तालुके ०९
एकूण गावे १३४१
एकूण ग्रामपंचायती ८६१
एकूण सरासरी पर्जन्यमान ७२५.८ मिमी

जिल्ह्यातील तालुके
औरंगाबाद जिल्ह्यात ९ तालुके आहेत. तसेच या ९ तालुक्यांमध्ये एकूण १३४४ गावे आहेत.

तालुके पिन कोड
औरंगाबाद ४३१००१
खुलताबाद ४३११०९
सोयगांव ४३११०३
सिल्लोड ४३११०१
गंगापुर ४३११०७
कन्नड ४३११११
फुलंब्री ४३१११२
पैठण ४३११२०
वैजापूर ४२३७०१
AurangabadDistrict soygaon sillod kannad phulambri khultabad vaijapur gangapur aurangabad paithan

इतिहास

सन १६१० मध्ये निजामशहाचा सरदार मलिक अंबर याने औरंगाबाद शहर वसविले. औरंगाबादला दरवाजांचे शहर म्हटले जाते. मुघल बादशहा औरंगजेब याने आपली राजधानी औरंगाबाद येथे आणली त्यावेळी ५४ रस्ते भिंतीच्या सहाय्याने जोडण्यात आले. सन १६८२ मध्ये मराठ्यांपासून संरक्षण व्हावे म्हणून मोठी भिंत बांधली गेली. या भिंतीला मुख्य आणि उपमुख्य असे एकूण ५४ दरवाजे बनविण्यात आले. पिण्याच्या पाण्यासाठी १४ नहरी बांधल्या त्यातील दोन नहरी अजून चालू आहेत. औरंगजेब त्याच्या मृत्युपर्यंत औरंगाबाद येथेच राहिला. औरंगजेबाच्या मृत्युनंतर औरंगाबाद शहर, हैदराबाद निजामाच्या राजवटीत सामिल झाले. भारताच्या स्वातंत्र्यानंतर १७ सप्टेंबर १९४८ रोजी हैदराबाद हे निजामाकडून मुक्त झाले. १ नोव्हेंबर १९५६ रोजी औरंगाबाद जिल्ह्यासह मराठवाडा हा विभाग हैदराबाद राज्यातुन तत्कालीन बॉम्बे राज्यात विलीन झाले.

औरंगाबाद जिल्ह्यातील औरंगाबाद तालुक्यात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, विभागीय आयुक्तालय, जिल्हाधिकारी कार्यालय, औरंगाबाद महानगरपालिका, बीबी का मकबरा, दौलताबाद येथील देवगिरी किल्ला, पानचक्की, बुध्द लेणी, मुघलकालीन एकूण ५२ दरवाजे, इ. आहेत तर सोयगाव तालुक्यातील अजिंठा गावात जगप्रसिद्ध अजिंठा लेणी आहे आणि खुलताबाद तालुक्यातील वेरूळ गावात जगप्रसिद्ध वेरूळ लेणी आणि घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग, पैठण येथे संत एकनाथ महाराजांचे समाधीस्थळ, जायकवाडी धरण याच जिल्ह्यात आहेत.

औरंगाबाद जिल्हा हा भारतातील एकमेव जिल्हा आहे, ज्यात २ जगप्रसिद्ध हेरिटेज वास्तू (अजिंठा लेणी व वेरूळ लेणी) आहेत. जिल्ह्यातील पैठण हे ऐतिहासीक शहर पैठणी साड्यांसाठी प्रसिद्ध आहे. तसेच जिल्ह्यातील हिमरू शाल प्रसिद्ध आहे.

औरंगाबाद येथे संक्रांतीला पतंगबाजी रंगते. येथील पतंग देशभरात उडविले जातात. येथील पतंगांचे वैशिष्ट्य म्हणजे हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्यात आकाशात चांगल्या प्रकारे उडू शकतात.

जिल्ह्याचे क्षेत्रफळ १०१०० चौ.कि.मी असून लोकसंख्या ३७.०१ लाख इतकी आहे.

जिल्ह्यातील प्रमुख पीके- कापूस, बाजरी, मका, तूर, मूग, ज्वारी, गहू

जिल्ह्यातील प्रमुख नद्या- गोदावरी, तापी, पूर्णा

जिल्ह्यातील पर्यटनस्थळे
 • अजंठा - वेरूळ लेण्या : ५ व्या - ८ व्या शतकात गुफेत साकारलेल्या लेण्या
 • दौलताबाद किल्ला : मोहम्मद तुघलकाची राजधानी
 • खुलताबाद : मुघल बादशहा औरंगजेबाची कबर
 • बीबी का मकबरा : बेगम राबीयाची (बादशहा औरंगजेबाच्या पत्नीची) कबर
 • घृष्णेश्वर मंदीर : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक (बारावे ज्योतिर्लिंग)
 • पाणचक्की
 • पैठण : संत एकनाथ यांचे गाव
 • जायकवाडी धरण : नाथसागर
 • औरंगाबाद गुफा आणि औरंगाबाद लेणी
 • ५२ दरवाजे
औरंगाबाद जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी यांची माहिती
येथे क्लिक करा.

राजकीय संरचना

लोकसभा मतदारसंघ : औरंगाबाद, कन्नड, खुलताबाद, गंगापूर, वैजापूर, सिल्लोड हे सहा विधानसभा मतदारसंघ मिळून औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ तयार झाला आहे. तसेच औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण, फुलंब्री व सोयगाव हे तीन विधानसभा मतदारसंघ जालना लोकसभा मतदारसंघाला जोडण्यात आले आहेत.

विधानसभा मतदारसंघ : जिल्ह्यात अकरा विधानसभा मतदारसंघ आहेत- औरंगाबाद (मध्य), औरंगाबाद (पुर्व), औरंगाबाद (पश्चिम), कन्नड, खुलताबाद, गंगापूर, वैजापूर, सिल्लोड, पैठण, फुलंब्री व सोयगाव.

जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे ६० मतदारसंघ आहेत, तर पंचायत समितीचे १२० मतदारसंघ आहेत.

महानगर पालिका मतदारसंघ : औरंगाबाद जिल्ह्यात औरंगाबाद या तालुक्यातील औरंगाबाद शहरात औरंगाबाद महानगर पालिका आहे. त्यात महानगर पालिकेचे ११३ आणि शहरात नव्याने समाविष्ट झालेले सातारा व देवळाई परिसर हे ०२ असे एकूण ११५ मतदारसंघ आहेत.

उद्योग :

जिल्ह्यात औरंगाबाद तालुक्यात वाळूज, चिकलठाणा, शेंद्रा या ठिकाणी तसेच पैठण तालुक्यात औद्योगिक वसाहती आहेत. शेंद्रा औद्योगिक वसाहत हि पंचतारांकित औद्योगिक वसाहत आहे. या औद्योगिक वसाहतींमध्ये ऑटोमोबाईल, औषध निर्माण, रासायनिक, मद्य निर्माण क्षेत्रातील अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत. चिकलठाणा येथे एक आय.टी. पार्क आहे. याव्यतिरिक्त जिल्ह्यात अनेक कंपन्यांचे कॉल सेन्टर्स तसेच छोट्या आय.टी. कंपन्या सुद्धा आहेत.

औरंगाबादला कसे पोहोचाल?
औरंगाबाद ला येण्यासाठी महामार्ग, लोहमार्ग आणि हवाई मार्ग असे विविध पर्याय उपलब्ध आहेत.

१. महत्त्वाचे महामार्ग
मुंबई - औरंगाबाद
हैदराबाद - औरंगाबाद
नागपूर - औरंगाबाद
पुणे - औरंगाबाद

२. लोहमार्ग
मुंबई - औरंगाबाद
हैदराबाद - नांदेड - औरंगाबाद
सिकंदराबाद - बंगळूरू - परभणी - औरंगाबाद

३. हवाई मार्ग
दिल्ली - मुंबई - औरंगाबाद
मुंबई - औरंगाबाद

औरंगाबाद पासून इतर महत्त्वांच्या शहरातील अंतर
 • औरंगाबाद-मुंबई : ३३४ किमी
 • औरंगाबाद-नाशिक : १८२ किमी
 • औरंगाबाद-पुणे : २३५ किमी
 • औरंगाबाद-नागपूर : ४७८ किमी
 • औरंगाबाद-हैदराबाद : ५४० किमी
 • औरंगाबाद-दिल्ली : १२५६ किमी
 • औरंगाबाद-इंदोर : ४१० किमी
 • औरंगाबाद-सुरत : ३७६ किमी

पाटोदा, ता. औरंगाबाद - आदर्श गाव

 • पाटोदा ग्रामपंचायत (ता. औरंगाबाद) कार्यालयाची वेबसाईट
  www[dot]gskpatoda[dot]in

निवडक 


वृक्ष लावा बाळगा अभिमान, तरच वाढेल देशाची शान| Save water, it will save you later! पढेगा लीखेगा भारत, तो आगे बढेगा भारत| स्वच्छ भारत, स्वस्थ भारत| स्वच्छ भारत, सशक्त भारत| स्वच्छ भारत, समर्थ भारत| बेटी है कुदरत का उपहार, मत करो इसका तिरस्कार| एक पेड, एक जिंदगी| पाणी अडवा, पाणी जिरवा| Go Green to Keep it Clean| बेटी बचाओ, बेटी पढाओ| झाडे लावू या, झाडे जगवू या|

up